डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाचनालयाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:12 IST2021-04-16T04:12:13+5:302021-04-16T04:12:13+5:30
शिंदी बु. येथील वाचनालयाचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राहुल गाठे यांच्या हस्ते व पोही येथील वाचनालयाचे उद्घाटन सरपंच ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला वाचनालयाची स्थापना
शिंदी बु. येथील वाचनालयाचे उद्घाटन तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राहुल गाठे यांच्या हस्ते व पोही येथील वाचनालयाचे उद्घाटन सरपंच रजनी गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती देवेंद्र पेटकर, माजी उपसभापती राजेंद्र पवार, अरुण सारडे, विनोद बदरके, उपारपंच मो. शहजाद, सदस्य शेख इस्माईल शेख बहाद्दर, रोशन कविटकर, वैभव रोही, अश्विनी पेटकर, माजी सदस्य राजकन्या गाठे, पृथ्वीराज गजभिये, देवानंद गजभिये उपस्थित होते. संचालन राजेश सूर्यवंशी व राजू गाठे यांनी केले.
पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांनी वाचनालयाला भेट देत स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थित युवकास मार्गदर्शन केले आणि पुस्तक भेट देण्याची ग्वाही दिली. कोरोना नियमाचे पालन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमासाठी विनीत वानखडे, विशाल गाठे, उमेश दांडगे, नागेश वानखडे, विशाल गाठे, प्रवीण दाभाडे, धम्मवीर वानखडे आदी उपस्थित होते.