डॉ. बाबासाहेब पॅनलचा एकहाती विजय; शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचा निवडणूक निकाल जाहीर
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 4, 2024 17:02 IST2024-02-04T17:01:46+5:302024-02-04T17:02:00+5:30
या निवडणुकीसाठी एकूण १९५९ मतदार होते.

डॉ. बाबासाहेब पॅनलचा एकहाती विजय; शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचा निवडणूक निकाल जाहीर
अमरावती: जिल्ह्यातील सहकारात महत्वाचे स्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक कर्मचारी पतसंस्था निवडणुकीचा निकाल रविवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये ११ संचालक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब पॅनलने एकहाती विजय मिळविला. या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण १९५९ मतदार होते. यामध्ये सात तालुक्यांतील केंद्रांवर १०८५ (५५ टक्के) मतदान झाले. यामध्ये डॉ. बाबासाहेब पॅनल व प्रगती पॅनलमध्ये काट्याची लढत झाली. रविवारी येथील रुख्मिनीनगरातील एक मंगल कार्यालयात असलेल्या मतमोजणी केंद्रात सकाळी मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सर्वसामान्य प्रवर्गात मीना कास्देकर, संदीप रक्षित, रत्ना नांदूरकर, सुनंदा नेमाडे, निलावंती गजभिये, सुरज सावळे हे उमेदवार बहुमताने विजयी झाले.
याशिवाय महिला राखीवमध्ये शांता धांडे, वंदना रक्षित, व्हीजे-एनटी प्रवर्गात लीना राऊत, नामाप्रमध्ये रजनी दाभाडे व अनु. जाती जमाती प्रवर्गात ज्योती पटेल विजयी झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पर्यवेक्षक शिल्पा कोल्हे यांनी काम पाहिले. याशिवाय डीडीआर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.