डॉ.आंबेडकर लिखित संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:51+5:30

समता, स्वातंत्र्य, न्याय-बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आज संविधानामुळे टिकून आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद भगत यांनी मांडले. आदिवासी गोवारी समाजाच्या संस्कृतीबद्दल विस्तृत माहिती आदिवासी गोवारी समन्वय समितीचे तालुका समन्वयक रामभाऊ शेंदरे यांनी दिली. गोवारी समाजाने आदिवासींच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सरपंच धीरज मुडे यांनी व्यक्त केले.

Dr Ambedkar's written constitution is the national anthem of the country | डॉ.आंबेडकर लिखित संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ

डॉ.आंबेडकर लिखित संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ

ठळक मुद्देमाणिक तोडसाम : आदिवासी गोवारी युवकांनी केले एकल वाचन, ‘भारतरत्न’ प्रतिमेचे पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान देशाला अर्पण केले, त्या संविधानावर देशाचा कारभार, प्रशासकीय यंत्रणेचा डोलारा चालतो. त्यामुळे हा देशाचा राष्ट्रग्रंथच असल्याचे मत आदिवासी समाजाचे नेते माणिक तोडसाम यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील जळगाव आर्वी येथील आदिवासी गोवारी युवकांच्यावतीने संविधान दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. आदिवासी गोवारी समाजातील प्रत्येक महिला, पुरुष व युवकांनी स्वतंत्रपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत संविधानाचे वाचन केले. संविधानासोबतच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे विचार दैनंदिन जीवनात अंमलात आणण्याची शपथ या गरीब आदिवासी गोवारी समाजबांधवांनी घेतली.
समता, स्वातंत्र्य, न्याय-बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आज संविधानामुळे टिकून आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे वाचन करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अरविंद भगत यांनी मांडले. आदिवासी गोवारी समाजाच्या संस्कृतीबद्दल विस्तृत माहिती आदिवासी गोवारी समन्वय समितीचे तालुका समन्वयक रामभाऊ शेंदरे यांनी दिली. गोवारी समाजाने आदिवासींच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन माजी सरपंच धीरज मुडे यांनी व्यक्त केले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सोबतच आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन संविधानामुळे मिळाले, असे पत्रकार मंगेश भुजबळ यांनी आपल्या भाषणातून सांगितले. मंचावर उपसरपंच संदीप भोगे, श्यामराव सहारे, संतोष नेहारे, भगवान पंधरे, पंडित कांबळे, प्रवीण चौधरी, रमेश सहारे यांची उपस्थिती होती.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागपुरातील शहीद ११४ गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक आदिवासी गोवारी समाजाचे राज्य संघटक मोहन राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी शंकर सहारे, जगन राऊत, श्रीकृष्ण सहारे, आकाश नेवारे, रुपेश काळसर्पे, अनिकेत सहारे, संतोष सोनवणे, चंदू राऊत, गजानन नेवारे, राहुल सहारे, ललित नेवारे, संतोष काळसर्पे, संजय सहारे यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Dr Ambedkar's written constitution is the national anthem of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.