निरी करणार 'डीपीआर'

By Admin | Updated: August 5, 2016 00:24 IST2016-08-05T00:24:12+5:302016-08-05T00:24:12+5:30

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूरचे प्रधान विशेषज्ञ राजेश बीनीवाले व कनिष्ठ विशेषज्ञ रितेश विजय यांनी बुधवारी अंबा नाल्याची पाहणी केली .

'DPR' to be done | निरी करणार 'डीपीआर'

निरी करणार 'डीपीआर'

मोठ्या नाल्यांचा कायापालट : महापालिकेचा पुढाकार
अमरावती : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूरचे प्रधान विशेषज्ञ राजेश बीनीवाले व कनिष्ठ विशेषज्ञ रितेश विजय यांनी बुधवारी अंबा नाल्याची पाहणी केली . या नाल्यामधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याची उपयुक्तता वाढविणे व नाल्याचे सौंदर्यीकरण करणे या विषयी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना मनपा आयुक्त यांनी केल्या होत्या.नरीचे अधिकारी यांनी राजापेठ, नमुना, अंबादेवी एचव्हीपीएम येथील नाल्याची पाहणी केली.
या प्रकल्पामुळे पाण्याची उपयुक्तता वाढेल तसेच नाल्याचे सौदर्यीकरण वाढ होईल अशा आशावाद व्यक्त केला. आयुक्त यांनी पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूरचे संचालक राकेशकुमार यांचेशी संपर्क साधून प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून याबाबत डीपीआर तयार करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे वरील प्रधान विशेष बिनिवाले व कनिष्ठ विशेषज्ञ रितेश विजय यांनी भेट दिली.
राजोपठ, नमुना, अंबादेवी, एव्हीपीपीएम येथे नाल्याचा संगम इत्यादी ठिकाणी निरीक्षण केले व नाल्याची सध्यास्थिती जाणून घेतली. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना अंबानाल्याबाबत आवश्यक माहिती दिली. शहरात भुयारी गटार योजना व कार्यान्वित सेवरेज ट्रिटमेंट प्लान्टबाबत मजीप्राचे अभियंता यांनी माहिती दिली. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करुन विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत निरीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे नाल्याचे पाणी प्रदूषण मुक्त करता येईल व पाण्याचा उपयोग भाजीपाला उत्पादनसाठी व शेती साठी पाण्याचा उपयोग करता येईल.
यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक दिनेश बूब, मिलींद बांबल, शहर अभियंता जीवन सदार, उपअभियंता सुहास चव्हाण, कार्यकारी अभियंता १ अनंत पोतदार, उपअभियंता मजीप्रा जे. एन. गजभिये, सहाय्यक उपअभियंता आनंद जोशी यांनी नाल्याचे निरीक्षक केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'DPR' to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.