११ रस्त्यांचे डीपीआर मे अखेर सादर होणार

By Admin | Updated: May 23, 2017 00:11 IST2017-05-23T00:11:43+5:302017-05-23T00:11:43+5:30

शासनाच्या हायब्रिड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या जिल्ह्यातील ११ महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

The DPR of 11 roads will be presented at the end | ११ रस्त्यांचे डीपीआर मे अखेर सादर होणार

११ रस्त्यांचे डीपीआर मे अखेर सादर होणार

अधीक्षक अभियंत्यांची माहिती : विकासाला मिळणार गती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाच्या हायब्रिड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या जिल्ह्यातील ११ महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांचा डीपीआर (रस्ते विकास आराखडा) तयार करण्याचे काम सुरू असून तो शासनाला ३१ मे च्या आत सादर करावा लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी दिली.
शासनाच्या १६१६ कोटी रूपयांच्या निधीतून ११ राज्य महामार्गाचे ४५९ किमीच्या रस्त्यांचे कामे होणार आहे. डीपीआर रिपोर्ट सादर झाल्यानंतर या कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू होतील. यामध्ये ४५९ किमी रस्त्याचे १० मीटरचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. सदर काम कंत्राटदाराला मिळाल्यानंतर या कामांवर ६० टक्के निधींची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर शासन सदर कंत्राटदाराला १५ वर्षांपर्यंत सदर कामांचे देयके परत करणार आहे. पण या १५ वर्षांत सदर कामांची दुरू स्तींची व देखभाल त्या कंत्राटदाराला करावी लागेल. या कामांची देयके शासन १५ वर्षांपर्यंत अदा करणार असल्याचे सदर करारनाम्यावरच नमूद केल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. ४५९ किलोमिटरचे करण्यात येत असलेल्या रस्ता रूंदीकरणात १० मीटरपर्यंत रूंदी वाढविण्यात येणार आहे. या मार्गावरून हजारो वाहनांची रोज वर्दळ असते. या रस्त्यांमध्ये अमरावती-मिनी बायपास, वलगाव-दर्यापूर, अमरावती-भातकुली-आसरा, दर्यापूर- अंजनगाव, परतवाडा-चिखलदारा-घटांग, अमरावती- चांदूररेल्वे -धामणगाव रेल्वे अमरावती-कुऱ्हा, कौंडण्यपूर आदी महामार्गांचा समावेश आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्र. १२ पुलगाव ते कारंजा ७६.९० किमी लांबीच्या रस्त्यांच्या कामाचाही यात समावेश आहे? त्यामुळे अनेकदा अरूंद रस्त्यामुळे अनेक अपघात होतात. त्याला रस्त्यांचे रूंदीवाढल्यामुळे काही प्रमाणात आळा बसणार आहे.

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल ३१ मे पर्यंत सादर होऊ शकतो. यानंतर कामांच्या निविदा काढल्यानंतर कामे सुरू होणार आहे.
- विवेक साळवे,
अधिक्षक अभियंता, अमरावती

Web Title: The DPR of 11 roads will be presented at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.