विद्यापीठ लॅबमध्ये चाचण्यांचा वेग दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:54+5:30
सद्यस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण लॅबद्वारा रोज २५० नमुन्यांची तपासणी होत आहे. आता नवी मशीन इन्स्टॉल करण्यात आल्यामुळे नमुने तपासणीचा वेग दुपटीने वाढणार आहे. याद्वारे त्वरेने संक्रमित निष्पन्न होऊन त्यांचेवर उपचार केले जाणार आहेत. सुपर स्पेशालिटीच्या तिसऱ्या माळ्यावर संक्रमित महिलांसाठी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

विद्यापीठ लॅबमध्ये चाचण्यांचा वेग दुप्पट
अमरावती : जिल्ह्यातील असिम्प्टमॅटिक व हायरिस्कचे रुग्ण त्वरेने ओळखता यावे, यासाठी चाचण्यांची संख्यावाढ करण्यात आलेली आहे. आता विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण लॅबमध्ये एक नवीन मशीन गुरुवारपासून कार्यान्वित होईल व याद्वारे रोज ५०० ते ६०० नमुन्यांचे परीक्षण होणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी सांगितले.
सद्यस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण लॅबद्वारा रोज २५० नमुन्यांची तपासणी होत आहे. आता नवी मशीन इन्स्टॉल करण्यात आल्यामुळे नमुने तपासणीचा वेग दुपटीने वाढणार आहे. याद्वारे त्वरेने संक्रमित निष्पन्न होऊन त्यांचेवर उपचार केले जाणार आहेत. सुपर स्पेशालिटीच्या तिसऱ्या माळ्यावर संक्रमित महिलांसाठी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी ५० बेडची सुविधा आहे. यासोबतच आता जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ असलेल्या परिचारिका रुग्णालयातदेखील संक्रमित महिलांसाठी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा चार दिवसांत सुरू होईल व या सर्व ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ राहणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्यात १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान पुन्हा तहसीलदारांच्या मार्गदर्शनात पथकांचे गठण करून विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे कायद्याचे उल्लंघन करणाºयांना चाप बसणार आहे. जिल्ह्यातील ८० टक्क्यांवर संक्रमित व्यक्तीचे मृत्यूसाठी इतरही आजार कारणीभूत आहेत. सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात १५० वर रुग्णांना आॅक्सिजन लागले. आरोग्य यंत्रणाद्वारे या संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दैनंदिन तपासणीत सरासरी ३५ व पीडीएमसीमध्ये १५ हून अधिक रुग्ण ‘सारी’चे असल्याचे निष्पन्न होत आहेत.
संक्रमितांशी विद्यापीठ चमूची चर्चा
विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाद्वारे एक टीम तयार करून दोन हजारांवर संकमित रुग्णांशी संवाद साधण्यात येणार आहे. याद्वारे संकमितांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केले जातील. संक्रमित रुग्ण एंगेज राहावा, यासाठी हा उपक्रम आहे. या काळात सामाजिक वातावरणाचा त्यांना येणारा अनुभव, यासह उपचार व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
होम आयसोलेशनमध्ये १३८ रुग्ण
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २५० संक्रमित रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा देण्यात आलेली आहे. यापैकी सद्यस्थितीत १३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. उर्वरित रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना मुक्त करण्यात आले. याशिवाय होम आयसोलेशन कॉल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आतापर्यंत ५५० रुग्णांना कॉल केल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.