घाबरू नका, ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:43+5:302021-04-05T04:11:43+5:30
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत मुबलक ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ...

घाबरू नका, ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत मुबलक ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये पुरेल एवढा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा शिल्लक असून, जिल्ह्याची सात ते आठ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असल्याची माहिती अमरावती औषधी प्रशासन विभागाने सांगितले.
ऑक्सिजनच्या तुटवड्यावर स्वत: एफडीएचे आयुक्त (मुंबई) लक्ष ठेवून आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून स्थानिक अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच्या स्थितीची आढावा नुकताच घेतला.
ऑक्सिजन सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होऊ नये, यावरही प्रशासनाचे बारकईने लक्ष आहे. अमरावती जिल्ह्याकरिता ऑक्सिजनचा पुरवठा हा एमआयडीसीत असलेल्या मे. वल्लभ गॅसेस, अमरावती यांच्याकडून केला जातो. सद्यस्थितीत शासकीय व खासगी रुग्णालयाकडून सात ते आठ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असल्याची माहिती एफडीचे अधिकारी मनीष गोतमारे यांनी दिली. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा होऊ नये म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत. एफडीच्या आयुक्तांकडून जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजनची मागणी, पुरवठा याचे नियोजन प्रशासनाकडून केले किंवा नाही, याचा आढावा घेतला.
बॉक्स:
रेमडेसिवीर इंजेक्शनचाही साठा उपलब्ध
कोविड- १९ या साथीच्या रोगावर सध्या प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठासुद्धा जिल्ह्यातील प्रमुख औषध दुकांनामध्ये तसेच शासकीय रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तसेच त्याच्या किमती नियंत्रित ठेवण्याकरिता एफडीएचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन व कोराना आजारावरील औषधींचा काळाबाजार आढळल्यास एफडीच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.