लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील घोडदेव डोंगर यावली परिसरात २२ जून रोजी अचानक चक्री वादळासह दमदार पाऊस बरसला. यामध्ये शेतातील संत्राझाडे व सागाच्या झाडांसह इतर वृक्ष उन्मळून पडल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत असताना आधीच भीषण दुष्काळ व कोरोना विषाणूमुळे संत्रा काढणीला आला असताना निर्यातबंदीमुळे संत्रा पडून राहिल्यामुळे संत्रा कवडीमोल भावात विकावा लागला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी अडचणीत असतानाच टोळधाडीचेही आक्रमण झाल्यामुळे संत्रा उत्पादक पूर्णत: हवालदिल झाला. आता पुन्हा वादळी पवसामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. घोडदेव, डोंगर यावली परिसरात बुधवारी रात्री १ वाजता झालेल्या चक्री वादळाने संत्राझाडे उन्मळून पडली. डोंगर यावली, घोडदेव येथील मनीष गुडधे यांच्या शेतातील गोठा पडल्याने गाय जखमी झाली.मोर्शी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. सध्या आंबिया बहराची फळे वाढत आहेत. त्यामुळे यावर्षी चांगलेच उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. परंतु वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे संत्राफळे पिवळी पडू लागल्यामुळे हातातोंडाशी आलेले पिके गळून नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणीअंती पंचनामे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रशासनाला दिले आहे. याची माहिती बळीराजा संत्रा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष रुपेश वाळके यांनी कृषी विभागाला दिली असता, तालुका कृषी अधिकारी कुंटावार, मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के, कृषी पर्यवेक्षक मोहन फुले, कृषी सहायक दिनेश चौधरी, प्रवीण सातव, रुपेश वाळके, अजय केंदळे, मनीष गुडधे यांनी नुकसानीची पाहणी केली.
डोंगर यावली, घोडदेव परिसराला मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST
मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करीत असताना आधीच भीषण दुष्काळ व कोरोना विषाणूमुळे संत्रा काढणीला आला असताना निर्यातबंदीमुळे संत्रा पडून राहिल्यामुळे संत्रा कवडीमोल भावात विकावा लागला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले.
डोंगर यावली, घोडदेव परिसराला मोठा फटका
ठळक मुद्देसंत्रा उत्पादक हवालदिल : वादळी पावसाने कोट्यवधींचे नुकसान