शेतकºयांना अनुदान त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 00:58 IST2017-10-22T00:58:36+5:302017-10-22T00:58:45+5:30
गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे २५ क्विंटलपर्यंतचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, .....

शेतकºयांना अनुदान त्वरित द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे २५ क्विंटलपर्यंतचे जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, या मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदार मनोज लोणारकर यांना देण्यात आले.
गतवर्षीच्या हंगामात डिसेंबरपर्यंत व्यापाºयांनी कमी भावात सोयाबीन खरेदी केल होते. या शेतकºयांनी मार्केट कमेटीच्या माध्यमातून सोयाबीन विकले होते. त्या शेतकºयांना २०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे अनुदान शासनाने जाहीर केले होते. शेतकºयांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून बाजार समितीत अनुदानाबाबत अर्ज सादर केले होते. पण ९ महिन्यांचा कालावधी होऊनही ते अनुदान अद्यापही शेतकºयांना प्राप्त झाले नाही. आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांना जाहीर केलेले अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी अक्षय पारसकर, देवीदास सुने, अमोल धवसे, विठ्ठलराव चांदणे, गजानन मारोटकर, फिरोज खाँ आदी उपस्थित होते.