तिवसा तालुक्यात स्थानिक विकास आघाडीचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:43+5:302021-01-19T04:15:43+5:30
तिवसा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतमोजणीअंती २७६ जागांवरील सदस्य घोषित करण्यात आले. यासाठी ६०१ उमेदवार रिंगणात ...

तिवसा तालुक्यात स्थानिक विकास आघाडीचा बोलबाला
तिवसा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतमोजणीअंती २७६ जागांवरील सदस्य घोषित करण्यात आले. यासाठी ६०१ उमेदवार रिंगणात होते, ठाणाठुणी ग्रामपंचायत व दापोरी येथील एक जागा अविरोध झाली. दापोरी व जावरा येथे काँग्रेस व शिवसेनेने बाजी मारली. सारशी येथे काँग्रेस (रोशन ठाकरे गट), तळेगाव ठाकूर येथे सतीश पारधी पॅनल, सुरवाडी येथे प्रदीप राऊत व अतुल गवड गट, वरखेड येथे जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके व दिलीप भुयार यांचे पॅनेल, भारवाडी येथे सचिन राऊत गट, शेंदूरजना बाजार येथे काँग्रेस (दीपक सावरकर गट), गुरुदेवनगर येथे काँग्रेस (सुरेश साबळे गट), शेंदोळा खुर्द व मोझरी येथे काँग्रेस, शिवणगावात स्थानिक आघाडी, धामंत्रीत काँग्रेस-शिवसेना युती, मारडा, वऱ्हा, धोत्रा, मूर्तिजापूर तरोडा, शिरजगाव मोझरी व शेंदोळा बु. येथे स्थानिक आघाडी, वाठोडा खुर्द येथे प्रवीण केने गट, माळेगाव येथे भाजप व स्थानिक आघाडी, दिवानखेड येथे काँग्रेस आघाडी, तर मार्डी येथे काँग्रेसने बाजी मारली. ठानाठुनी ग्रामपंचायतमध्ये स्थानिक विकास आघाडीने बाजी मारली आहे,