देशी, विदेशी दारू वाहतूक रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:36+5:302021-07-28T04:13:36+5:30

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशान्वये विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोनुने, कॉन्स्टेबल सूरज चव्हाण, सूरज ...

Domestic, foreign liquor transport on the radar | देशी, विदेशी दारू वाहतूक रडारवर

देशी, विदेशी दारू वाहतूक रडारवर

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशान्वये विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोनुने, कॉन्स्टेबल सूरज चव्हाण, सूरज मेश्राम, राजिक यांनी गाडगेनगर हद्दीतील गर्ल्स हायस्कूल चाैकातून अल्पवयीन मुले ताब्यात घेतली. त्यांच्याकडून दुचाकीसह ४३ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फ्रेजरपुरा हद्दीतील अंबिकानगर येथे मनपा शाळेजवळ अमोल गोपाळराव भस्मे (३४), अमित देविप्रसाद विश्वकर्मा (२०, रा. विलासनगर, अमरावती) हे दोन दुचाकींवर अवैध दारूविक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून चार पेट्या देशी दारू, दोन दुचाकींसह एकूण १,०१,५२० रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातुर्णा भागात आकाश अशोक जाधव (२८, रा. विलासनगर) हा अवैध दारूविक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करताना आढळला. त्याच्या ताब्यातून दोन पेटी देशी दारूसह दुचाकी असा ६०,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गजानन पंजाबराव पारबे (२८, रा. महाजनपुरा) हा दुचाकीवर अवैध दारूवाहतूक करताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक पेटी देशी दारूसह दुचाकी असा ९३,६४० रुपयांचा मु्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Domestic, foreign liquor transport on the radar