मांजरखेड कसबा परिसरात कुत्री, माकडांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:50+5:302021-02-05T05:32:50+5:30
शेतातील पिकांची नासाडी, सकाळचा वेळ दगड भिरकावण्याचाच मांजरखेड कसबा : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात माकडांचा हैदोस वाढला ...

मांजरखेड कसबा परिसरात कुत्री, माकडांचा हैदोस
शेतातील पिकांची नासाडी, सकाळचा वेळ दगड भिरकावण्याचाच
मांजरखेड कसबा : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात माकडांचा हैदोस वाढला आहे. गावातील माकडांना बाहेर काढण्यासाठी सकाळीच पळापळ होते. दगड भिरकावले जातात. गावागावांमध्ये कुत्रीही वाढली असून, त्यांच्याकडून लहानग्यांना चाव्याची भीती सदोदित असते. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मांजरखेड कसबा, बासलापूर, चिरोडी आदी शिवारांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवसभर माकडांचा कडप्पा मांजरखेड कसबा परिसरातील जंगलात वास्तव्यास असतात. रात्री जंगलातून थेट गावात येतात. शेतात सध्या गहू, चणा, भाजीपाला आदी पिके आहेत. शेतीच्या रक्षणासाठी काटेरी कुंपण किंवा साध्य ताराचे कुपन घालूनदेखील रानडुकरे, माकडे आदि जनावरे पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी हैराण झाले आहेत. वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. याशिवाय कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, त्यांच्याकडून लहानग्यांना चावा घेतला जाण्याची भीती आहे.