अचलपुरात कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:54 IST2019-08-31T23:53:37+5:302019-08-31T23:54:00+5:30
मोकाट कुत्र्यांमुळे शाळेत ये-जा करणारी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाकडे अचलपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अचलपुरात कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : अचलपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीत जथ्थ्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत.
मोकाट कुत्र्यांमुळे शाळेत ये-जा करणारी लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाकडे अचलपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देवडी, चावलमंडी, झेंडा चौक, गांधी पूल, विलायतपुरा, बिलनपुरा, जीवनपुरा, विदर्भ मिल, अचलपूर नाका, चौधरी मैदान, टक्कर चौक या मुख्य भागात कुत्र्यांचे कळपचे कळप रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसतात. देवडी, चावलमंडी, विलायतपुरा, गांधी पूल या भागातील मटण मार्केट, हॉटेलसमोर या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. येथे उर्वरित साहित्य रस्त्यालगत टाकले जात असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी मोठ्या संख्येत मोकाट कुत्री येरझारा मारीत असतात.
बाहेरची कुत्री; चावे वाढले
अचलपुरात बाहेरून आणून कुत्रे सोडण्यात आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. अचानक कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण त्यांचे आहे. दिवसभर ही मोकाट कुत्रे सैरावैरा पळत असतात. गाड्यांच्या मागे धावतात. बाजारात जाणारी मुले, वृद्ध यांच्या अंगावर जाऊन चावा घेण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. दररोज अशा रुग्णांची संख्या उपजिल्हा रुग्णालयात बरीच असते.
नगरपालिका फक्त आश्वासन व आवाहन करून त्यापलीकडे कोणतेही पावले उचलताना दिसत नाही. रात्रीच्या वेळेस कुत्र्यांचा सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे. याशिवाय कुत्र्यांच्या विष्ठेने सर्वत्र घाण दिसून येत आहे.