शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सीएसना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण असते. त्यामुळे या विकृताविरुद्ध तेथील महिला स्टाफने आरोग्य यंत्रणेला कळविले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : चित्रा वाघ यांचा सवाल; महिला असुरक्षित असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात आरोग्य सेवेसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना उच्च न्यायालयात दोन वेळा माफी मागावी लागली. अमरावतीमध्ये जगात कुठेही घडला नाही असा अश्लाघ्य व गलिच्छ प्रकार घडला. त्यामुळे सीएसना खुर्चीत बसण्याचा अधिकार आहे का, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण असते. त्यामुळे या विकृताविरुद्ध तेथील महिला स्टाफने आरोग्य यंत्रणेला कळविले. मात्र, ती तोंडी तक्रार होती. याविषयी लेखी तक्रार केली असती, तर हा प्रकार घडलाच नसता, असे त्या म्हणाल्या.राज्यात काही विकृती फोफावत आहेत. ठिकठिकाणच्या घटना समोर येत असल्याने क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत, हे उजागर झाले. त्यामुळे महिलांना उपचार घ्यावेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात एक ‘एसओपी’ विरोधी पक्षनेत्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. त्यावर अंमल झालेला नसल्याचे वाघ यांनी सांगितले.कोरोनाकाळात क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असावेत, याठिकाणी सीसीटीव्ही असावा, येथील डॉक्टरसह सर्व कर्मचारी महिलाच असाव्यात, या केंद्रांवर तीन ते चार पोलीस कर्मचारी असावे व त्यांच्याजवळ पीपीई कीट असाव्यात आदी मागण्या वाघ यांनी मांडल्या. पत्रपरिषदेला प्रदेश सचिव अर्चना डेहणकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समितीच्या अध्यक्षा राधा कुरील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते.‘फ्रस्ट्रेट माईंड’मधून पालकमंत्र्याचे वक्तव्यराज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर संवेदनशील महिला आहेत. त्यांनी विरोधकांना आंधळे म्हटल्याने मनस्वी दु:ख झाले. स्थानिकांनी आवाज उठविल्याने ‘फ्रस्ट्रेट माईंड’मधून त्यांनी असे वक्तव्य केले. कोरोनासंबंधी स्वॅब हा नाक, घशातून घेतला जातो; अन्य अवयवातून नाही. यासाठी प्रशासनाने जागृती केली पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. सीएसवर आरोपासंदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Socialसामाजिक