लस देता का कुणी लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST2021-04-28T04:13:25+5:302021-04-28T04:13:25+5:30

पान २ पी लिड आर्त सवाल : फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा : कोविड लस न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड मोर्शी : ...

Does anyone get vaccinated? | लस देता का कुणी लस?

लस देता का कुणी लस?

पान २ पी लिड

आर्त सवाल : फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा : कोविड लस न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड

मोर्शी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी होत असल्यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

६० वर्षांवरील लसीकरणाच्या सुरुवातीला नागरिकांची गर्दी नव्हती. तथापि, ४५ वर्षे वयावरील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असताना, शहरात व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागल्यामुळे येथील नागरिक उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी करू लागले. एक तर पुरेशा प्रमाणात लस या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गर्दी होत आहे. सायंकाळपर्यंत रांगेत उभे राहणाऱ्यांना शेवटी परत जावे लागत आहे. गर्दीमुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांचा विचार प्राधान्याने केला जात नाही. उपजिल्हा रुग्णालयात केंद्रावर थर्मल स्क्रीनिंगसुद्धा होत नाही. परिणामी येथील कार्यरत कर्मचारी जीव मुठीत घेऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे.

सध्या दोन पोलीस शिपायांना गर्दी नियंत्रणासाठी याठिकाणी कामी लावण्यात आले. २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. कोविड सेंटर येथे भरती असणाऱ्या आठ रुग्णांवर योग्य उपचार होत आहे किंवा नाही, ऑक्सिजन पुरवठा होत आहे किंवा नाही, याची पाहणी त्यांनी केली. कोरोना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची भाऊगर्दी पाहून त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रत्येकाने तोंडाला मास्क लावावे. तद्वतच अँटिजेन रॅपिड चाचणी, लसीकरणाचा पहिला डोज व दुसरा डोज यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय कळसकर, तालुका वैद्यकीय अधिकारी जयस्वाल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रोहित नागले उपस्थित होते.

चौकट

लसीकरणसाठी निवडणुकीच्या मतदान केंद्रनिहाय आणि मतदान केंद्रावर लसीकरणाची योजना कार्यान्वित केल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. लसीकरण नियोजनाची जबाबदारी मतदान केंद्रनिहाय नगरसेवकांना दिल्यास प्रशासनास मदत होईल.

---------

Web Title: Does anyone get vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.