डॉक्टरांचे महापालिकेला ‘इंजेक्शन’

By Admin | Updated: November 15, 2014 22:39 IST2014-11-15T22:39:06+5:302014-11-15T22:39:06+5:30

पेशाने डॉक्टर असलेले अमरावतीचे नवनियुक्त आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चे ब्रिद वाक्य असलेल्या महापालिकेत शासन

Doctor's nod for 'injection' | डॉक्टरांचे महापालिकेला ‘इंजेक्शन’

डॉक्टरांचे महापालिकेला ‘इंजेक्शन’

अमरावती : पेशाने डॉक्टर असलेले अमरावतीचे नवनियुक्त आमदार सुनील देशमुख यांनी शनिवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चे ब्रिद वाक्य असलेल्या महापालिकेत शासन निधीचा धुराळा आणि शहर स्वच्छतेची वाट लागत असल्याबाबत त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. चांगले काम करा, अन्यथा कामचुकार अधिकाऱ्यांची खैर नाही, असा कानमंत्रही देण्यास आमदार विसरले नाहीत.
महापालिका आयुक्त कक्षानजीकच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीला आयुक्त अरुण डोंगरे, उपायुक्त विनायक औघड, रमेश मवासी, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, मदन तांबकेर, सुषमा मकेश्वर, योगेश पिठे, राहुल ओगले, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, लेखापाल शैलेंद्र गोसावी, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी, देवेंद्र गुल्हाणे, अजय जाधव, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, सा.बां. कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, प्रकाश देशमुख, गंगाप्रसाद जयस्वाल, गणेश कुत्तरमारे, वंदना गुल्हाने, दीपक खडेकार, पोपटकर, मंगेश जाधव, जीवन प्राधिकरणाचे अभियंता अरविंद सोनार, चेतवानी आदी उपस्थित होते. आ. देशमुख यांचे आयुक्त अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आढावा बैठकीला प्रारंभ झाला. महापालिकेतील बांधकाम परवानगीसाठी सुरु असलेली आॅटो- डीसीआर आॅनलाईन प्रणालीची माहिती घेतली. जीवन प्राधिकरणची २४ तास पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक स्टँड पोस्ट, ४४ कोटींची नगरोत्थान योजना, नवीन वस्त्यांमध्ये पाईन लाईन पुरवठ्याची वस्तुस्थिती, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेच्या अमंलबजावणीत येणाऱ्या अडचणी, शहर विकास आराखडा, भुयारी गटार योजना, मलनिस्सारण व्यवस्था, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात केलेली विकास कामे, राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मिती, नवाथे येथील भुयारी मार्ग, रमाई घरकूल आवास योजना, शिवटेकडी व भीमटेकडी विकास कामे, शहर विकास आराखडा, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, ऐतिहासिक परकोटाचे सौदर्र्यींकरण, आरोग्य सेवा, सुविधा, दैनदिंन साफसफाई, सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी, दवाखान्यांमध्ये आरोग्य सुविधा, सिटी बस, सफाई कंत्राटदाराची जबाबदारी अशा विविध समस्या आणि प्रश्नांवर देशमुख यांनी मंथन केले. दरम्यान शासन निधीतून रस्ते डांबरीकरणाची कामे, साफसफाईवर होत असलेला अवाजवी खर्च, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, डेंग्यूवर उपाययोजना, भुयारी गटार योजनेच्या पूर्णत्वासाठी येणाऱ्या अडचणींवर मंथन केले. मागील पाच वर्षांत काय झाले, या खोलात जायचे नाही; मात्र ही आढावा बैठक कागदोपत्री नसून निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा पुढच्या बैठकीत काही खैर नाही, ही आठवणदेखील सुनील देशमुख यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना करुन दिली, हे विशेष.

Web Title: Doctor's nod for 'injection'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.