जाँबाज पोलीस अधिकारी सिनेमातच बघायचे काय?

By Admin | Updated: June 22, 2014 23:46 IST2014-06-22T23:46:13+5:302014-06-22T23:46:13+5:30

छबीची चिंता न करता, पोलीस अधिकाऱ्यांची आश्चर्यकारकरीत्या पाठराखण करणारे अमरावतीचे पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या कराव्याच लागल्यात. शनिवारी रात्री हे आदेश

Do you want to see the police officer in the movie? | जाँबाज पोलीस अधिकारी सिनेमातच बघायचे काय?

जाँबाज पोलीस अधिकारी सिनेमातच बघायचे काय?

गणेश देशमुख - अमरावती
छबीची चिंता न करता, पोलीस अधिकाऱ्यांची आश्चर्यकारकरीत्या पाठराखण करणारे अमरावतीचे पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या कराव्याच लागल्यात. शनिवारी रात्री हे आदेश जारी झालेत. 'दहशत चोरांची' या वृत्तमालिकेतून लोकसुरक्षेच्या मुद्यावर 'लोकमत'ने सातत्यपूर्ण केलेल्या निर्भय लिखाणाचाच हा परिपाक!
डोळे विस्फारावेत असे भयंकर आकडे अवघ्या पाच महिन्यांतील घरफोडीचे आहेत. जवळजवळ १४० घरे चोरांनी जानेवारीपाून फोडली. ३४० चोऱ्या झाल्यात. शहरातील लोकांच्या सुरक्षेसाठी १९६७ पोलीस शहरभर तैनात आहेत. शहरात १० पोलीस ठाणी आहेत. ठाण्याचे सर्वेसर्वा असलेल्या ठाणेदाराने त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचे राज्य कायम राखावे, सुरक्षा व्यवस्था चोख राखावी, यासाठी तमाम सुविधा आणि विशेषाधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. हेच कर्तव्य बजावण्यासाठीचे वेतन घेणारे ठाणेदार निष्प्रभ ठरतात. चोर-घरफोडे ही बाब वारंवार सिद्ध करतात. एरवी अमरावती सुरक्षित असल्याचे मानणारे लोक मनातून हादरतात. पोलिसांवरचा विश्वासच उडतो. पोलीस कशासाठी, असा एकच प्रश्न जिकडे तिकडे विचारला जातो. हे सर्व घडत असताना सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे पालकत्त्व असलेल्या पोलीस आयुक्तांना अकार्यक्षम ठाणेदारांवर कुठलीही कारवाई करावीशी वाटत नाही. चोऱ्या घरफोड्यांचे प्रमाण जास्तच वाढल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ३६ शिपाई आणि जमादारांवर धडाघड कारवाई करून पोलीस आयुक्त मोकळे होतात.

Web Title: Do you want to see the police officer in the movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.