शासन देईना अन् बाजारात मिळेना
By Admin | Updated: July 20, 2015 00:12 IST2015-07-20T00:12:25+5:302015-07-20T00:12:25+5:30
बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि कायदा अंमलात आणून पहली ते आठवीच्या मुलांना मोफत पुस्तके देण्याची शासनाची योजना असली ...

शासन देईना अन् बाजारात मिळेना
गैरसोय : शालेय पुस्तकासाठी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे हाल
सुमित हरकुट चांदूरबाजार
बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि कायदा अंमलात आणून पहली ते आठवीच्या मुलांना मोफत पुस्तके देण्याची शासनाची योजना असली तरी अनेक ठिकाणी अपूर्ण पुस्तके आणि कायम व विनाअनुदानित शाळांना पुस्तकेच मिळत असल्याने शिक्षणाचा बट्याबोळ होत आहे.
प्राथमिक शिक्षणाची पाठ्यपुस्तके शासनातर्फे मोफत देण्याची योजना जाहीर झाल्यापासून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची पुस्तके दुकानावर मिळणे बंद झाले आहे. मुलांना पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करा, असे आदेश शासनाकडून मिळाले. एकाच दिवशी ही प्रक्रिया अवघड असली तरी शिक्षक तळमळीने प्रयत्न करतात. मात्र पुस्तकाची संख्या अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तक मिळू शकली नाहीत. काही विषयाची पुस्तके अद्यापपर्यंत विक्रीकरिता आलीच नाहीत. शाळा सुरु होऊन २० दिवस उलटले तरीही अनेक शाळांमध्ये पुस्तकांचे संच अपुरे पडले आहेत.
विद्यार्थी पुस्तकाविनाच शाळेत येत आहेत. सोबतच मुलांना पुस्तके मिळालीत मला का देत नाहीत? म्हणून ते शिक्षकांना जाब विचारुन निरुत्तर करतात. काहींनी तर तेवढ्याशासाठी शाळेत येणे बंद केले. या गोष्टींचा मुलाच्या अभ्यासक्रमावर व मानसिकतेवर परिणाम होत आहे. काही विषयाची पुस्तके नसल्योन बऱ्याच ठिकाणी शिकवणीला सुरुवात झालेली नाही. विद्यार्थ्यांनी खाजगी पुस्तके विकत घेण्याचा प्रयत्न केला असता बाजारात पुस्तक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अडचण येत आहेत. शासनाने मोफत पुस्तके वाटप योजना फक्त अनुदानित शाळांसाठी जाहीर केली असल्याने अनुदानित शाळांना अपूर्ण पडणारी पुस्तके विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्याने कुठलीही आर्थिक मदत नाही तर शिक्षकांनाही पगार नाही. त्यामुळे विकत घेणेही जिकरीचे झाले आहे.
पुस्तके विकतही मिळत नाही म्हणून तेथील विद्यार्थी अनुदानित शाळांमध्ये पळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पटसंख्येवर परिणाम होतो. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी ही अनुदानित शाळामधून पुस्तके मागून घेतात. काही मिळतात, काही मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नवीन पुस्तके परत घेण्याबाबतही कोणतेच नियम नाहीत. त्यांनी फाडली अथवा हरविली तरी त्या विद्यार्थ्यांना दंड करता येत नाही. अथवा शिक्षाही करता येत नाहीत. त्यामुळे मोजकीच पुस्तके वर्षाअखेर परत मिळविली जातात. परंतु दुसऱ्या वर्षी नियोजित पटसंख्येपेक्षा कमी पुस्तके परत न करता साठवून ठेवतात. यंदा वर्ग ५ वा, ६ वा, ७ वा, ८ वा वर्गातील विद्यार्थांना इंग्रजीतील विज्ञानाचे पुस्तक अद्याप पर्यंत मिळालेले नाही. जवळजवळ ७ हजार विद्यार्थी या विषयाचा अभ्यासापासून वंचित राहत आहेत. वाटपाचे नियोजन बिघडल्याने विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहे.
पुस्तक वाटपाची
तरतूद नाही
कायम व विनाअनुदानित शाळांना पुस्तके वाटण्याचे तरतूद नसल्याने नियमबाह्यरित्या त्यांना पुस्तके देऊ शकत नाही. शिक्षकांनी इतर विनाअनुदानित शाळांमधून पुस्तके गोळा करुन विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.