शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कुणालाही भिक्षा देऊ नका, त्यांच्या हाताला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 9:30 PM

भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.

ठळक मुद्देमुलाखत : डॉ.अभिजित सोनवणे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भीक मागणे हा तसा कायद्याने गुन्हा आहे. पण घरातून काढून दिलेले, नैराश्य आलेले किंवा आळशी लोक भिक्षा मागतात. भीक मागताना नागरिकांना भावनिक करण्यासाठी लहान मुलांचा उपयोग केला जातो. त्याकरिता लहान मुलांना पळवून आणले जातात. गरजूंना ओळखा त्यांच्याकडून कामे होत असेल तर भिक्षा देण्याऐवजी त्यांना काम देऊन स्वालंबी बनावा, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक सोनवणे यांनी केले.दिशा ग्रुप एज्युकेशन फांऊडेशन व प्रयास- सेवांकुर सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात ‘आम्ही बि घडलोे. तुम्ही बि घडाना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, अरुण गावंडे उपस्थित होते.प्रयास-सेवांकुरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सावजी यांनी भिक्षेकरूसमुदायासाठी काम करणारे सोहम ट्रस्टचे डॉ.अभिजित सोनवने यांची व सन २०१५ च्या बॅचचे आयएएस झालेले राहुल कर्डिले यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी उपस्थितांसमोर दोघांनीही आपल्या खडतर जीवन प्रवासाचा धागा उलडला. डॉक्टर झाल्यानंतरही सुरुवातीच्या काळात मला अतिशय संघर्ष करावा लागला. परंतु, मला एका भिक्षा मागणाऱ्या बाबांकडून प्रेरणा मिळाली. तेव्हापासूनच मी या समुदायासाठी काम सुरू केले. या कामात माझी पत्नी डॉ. मनीषा यांचा सिंहाचा वाटा आहे. आज मी ही चळवळ पुढे नेण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. पण, माझ्या पत्नीने कमाविलेल्या पैशातून ३० टक्के वाटा माझ्या सामाजिक कार्यावर खर्च करते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मी प्रत्येक भिक्षेकरूंना हाच उपदेश देतो की, 'तुम्ही भिक्षा मागू नका. तुम्हाला जे काम शक्य असेल ते करा आणि स्वावलंबी बना'. त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न असतो. आतापर्यंत ४३ आजी - आजोबांना यातून बाहेर काढल्याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांचा मी मुलगा झालो. नातू झालो. त्यांचेही मला भरभरून प्रेम मिळते. आज राज्यात ७५० भिक्षेकरुंच्या आम्ही संपर्कात आहोत. ते माझ्या कुटुंबाचा भाग झाले आहे. ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. त्या १६० जणांचे मोतीबिंदूचे आम्ही शस्त्रक्रिया करविली. या कार्यासाठी मला अनेकांची मदतीची हाक मिळते. तेव्हा मी त्यांना सांगतो, तीन गोष्टी करा. आपल्या वृद्ध आई- वडिलांना घराबाहेर काढू नका, कुणालाही भीक देऊ नका, त्यांच्या हाताला काम मिळवून द्या. लहान मुलांना घेऊन तुम्हाला भावनिक होऊन भीक मागत असेल तर अशांना बळी पडू नका. कारण भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांना पळविले जाते. अशांना भिक्षा दिली नाही तर हा प्रकार थांबविण्यास मदत होईल, असे अनेक अनुभव त्यांनी मुलाखतीदरम्यान कथन केले. संचालन मौसमी देशमुख यांनी केले.पूर्ण क्षमतेने अभ्यास करा, यश हमखासप्रामाणिक प्रयत्न, दृढ विश्वास, स्पर्धा परीक्षेचे योग्य नियोजन केले तर यश हमखास तुमच्याच हातात आहे. त्याकरिता तुमची पूर्ण क्षमता व शक्ती पणाला लावा, असा सल्ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी तथा धारणीचे एसडीओ व एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील असलेले राहुल कर्डिले यांचे वडील रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकला, तर पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम पुणे व नंतर दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. यामध्ये कठोर मेहनत करून यश मिळविले. त्यांनी जलसंधारण चळवळीतही कार्य केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. संगणकाचा व वर्तमानपत्राचा योग्य उपयोग करून जे कराल ते ताकदीने करा. यूपीएससीमध्ये यश न मिळाल्यास बी. प्लॅन तुमच्याकडे तयार ठेवा. पण निराश होऊ नका. यश हमखास तुम्हच्या हातात असेल, असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. अविनाश सावजी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राहुल कर्डिले यांनी अशाप्रकारे त्यांच्या आयुष्यातील आयएएसपर्यंतच्या जीवनप्रवासाचा धागा उलगडला.