दारूबंदी करा अन्यथा सामूहिक आत्महत्या

By Admin | Updated: June 23, 2015 01:02 IST2015-06-23T01:02:41+5:302015-06-23T01:02:41+5:30

रेवस्यात दारूबंदी करा अन्यथा सामूहिक आत्महत्या करू,

Do not abuse or otherwise commit suicide | दारूबंदी करा अन्यथा सामूहिक आत्महत्या

दारूबंदी करा अन्यथा सामूहिक आत्महत्या

रेवस्यातील महिलांचा इशारा : पोलीस आयुक्तांसमोर मांडले गाऱ्हाणे
अमरावती : रेवस्यात दारूबंदी करा अन्यथा सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा रेवसा येथील रहिवासी महिलांनी सोमवारी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना दिला. त्यांनी दारूबंदीचा आग्रह धरून आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले. त्यांनाही अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
रेवसातील अवैध दारू व्यवसायाविरोधात सोमवारी महिलांनी आक्रमक पावित्रा घेऊन पोलीस आयुक्तांसमोर दारूबंदी संदर्भात गाऱ्हाणे मांडले. या व्यवसायामुळे महिला, मुली, शाळकरी मुले व रेवसावासी त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या डोळ्यादेखत दारूचा व्यवसाय सुरु असल्यामुळे आहे. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उघड्यावर आले. तरुणासह लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे गावातील शांतता व सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. गावात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीची वारंवार तक्रारी वलगाव पोलीस ठाण्यात महिलांनी केल्या आहेत. मात्र, कारवाई केली नाही. पोलिसांचे अभय असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

यशोमती ठाकूर यांनी घेतला पुढाकार
रेवस्यातील महिलांची बाजू मांडण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी महिलांसोबत आ.यशोमती ठाकूर यांनीही पोलीस आयुक्तांशी चर्चा करून दारुबंदीसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. यावर पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे अश्वासन दिले.

Web Title: Do not abuse or otherwise commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.