६७ हजार बालकांना ‘दो बुंद जिंदगी के’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:26+5:302021-01-08T04:36:26+5:30

अमरावती : महापालिका क्षेत्रातील १३ शहरी आरोग्‍य केंद्रांमार्फत १७ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यात पाच ...

Do Do Bund Zindagi Ke to 67 thousand children | ६७ हजार बालकांना ‘दो बुंद जिंदगी के’

६७ हजार बालकांना ‘दो बुंद जिंदगी के’

अमरावती : महापालिका क्षेत्रातील १३ शहरी आरोग्‍य केंद्रांमार्फत १७ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यात पाच वर्षांआतील ६६,८९० बालकांना ‘दो बुंद जिंदगी के’ देण्यात येणार येत असल्याची माहिती आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. ३३२ बुथवर ८३७ आरोग्य कर्मचारी व ६५ बुथ सुपरवायझर व ८९७ बुथवरील कार्यकर्ते आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जाणार असल्याचे ते म्हणाले.

या मोहिमेची पुर्वतयारी व यशस्‍वीतेसाठी टास्‍क फोर्स समिती सभा आयुक्‍तांच्या अध्‍यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीला या बैठकीला उपायुक्‍त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे, शिक्षणाधिकारी अब्‍दुल राजीक, एस.एम.ओ. डब्‍ल्‍यू.एच.ओ. ठोसर, आर.सी.एच. नोडल ऑफिसर विक्रांत राजुरकर, प्रतिभा आत्राम, वैशाली मोटघरे, जयश्री नांदूरकर, रंजना बनारसे, वासंती कडू, पौर्णिमा उघडे, फिरोज खान, शारदा टेकाडे, स्‍वास्‍थ्य निरीक्षक आर.के. राठोड आदी उपस्थित होते. २४ वर्षे सातत्‍याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्वांनी प्रयत्‍न केल्‍यामुळे व अथक परिश्रमामुळेच देशात जानेवारी २०११ नंतर आतापर्यंत एकही पोलिओ रुग्‍ण आढळून आलेला नाही.

बॉक्स

नवजातापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना लस

नवजात अर्भकापासून ते ५ वर्षांपर्यंतच्‍या सर्व बालकांना यापूर्वी दिलेल्‍या लसीच्‍या मात्रांचा विचार न करता पोलिओ लस देण्यात येणार आहे. शहरातील लाभार्थ्‍यांपासून तात्‍पुरत्‍या वसाहती, स्‍थलांतरित वसाहतींतील लाभार्थी, झोपडपट्टी, बांधकाम, वीटभट्ट्या इत्‍यादी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्‍या मुलांनाही लस मिळावी, असे नियोजन करण्‍याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Web Title: Do Do Bund Zindagi Ke to 67 thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.