शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

पीएम’आवास योजनेवर ‘डीएमए’चा वॉच, नियंत्रणाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 4:11 PM

 प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे (डीएमए) सुकाणू अभिकरण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर थेट नगरविकास मंत्रालयाचा वॉच राहणार आहे.

अमरावती-  प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे (डीएमए) सुकाणू अभिकरण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर थेट नगरविकास मंत्रालयाचा वॉच राहणार आहे.

अमरावतीप्रमाणे अनेक ‘अमृत’ शहरांमध्ये पीएम आवास योजनेच्या अंमलबजावणीची गती मंदावली आहे. कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतरही लाभार्थ्यांच्या खात्यात तो हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या नियंत्रणाची जबाबदारी डीएमएवर सोपविण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) या अभियानाची सन २०१५ मध्ये घोषणा करण्यात आली. सर्व ‘अमृत’ शहरांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश होते. त्यानुसार अमरावती महापालिकेसह राज्यातील अन्य शहरांना केंद्राकडून कोट्यवधींचा निधी वितरित करण्यात आला. तथापि, अद्यापही लाभार्थीच निश्चित न झाल्याने ती रक्कम पडून आहे. त्या अनुषंगाने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडाव्यतिरिक्त डीएमएची सुकाणू अभिकरण अर्थात नोडल एजंसी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात सन २०२२ पर्यंत १९.४० लाख घरकुलांची आवश्यकता आहे. या योजनेंतर्गत सर्वेक्षण, प्रकल्पांची सविस्तर माहिती तसेच लाभार्थ्यांच्या माहितीची नोंद संबंधित महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीद्वारे ‘एमआयएस’मध्ये अनिवार्य आहे. ही कार्यवाही केल्याशिवाय लाभार्थींना योजनेचा लाभ देता येत नाही. अर्थात या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जाते. मात्र, गृहनिर्माण विभाग तसेच म्हाडाचे राज्यातील स्थानिक नागरी संस्थांवर प्रत्यक्ष कोणतेही नियंत्रण नसल्याचे निरीक्षण नगरविकास विभागाने नोंदविले. त्यामुळे म्हाडा आणि नगरविकास विभागाच्या आदेश व सूचनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडसर निर्माण झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले व त्या पार्श्वभूमीवर योजनेसाठी म्हाडाव्यतिरिक्त डीएमएला नोडल एजंसी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

ही असेल डीएमएची जबाबदारीप्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोडल एजंसी म्हणून डीएमए (नगरपालिका प्रशासन संचालनालय) राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांकडून सर्वेक्षण, प्रकल्पांची सविस्तर माहिती आणि लाभार्थ्यांच्या माहितीची नोंद ‘पीएमएवाय-एमआयएस’मध्ये करण्याबाबत पाठपुरावा करेल व आढावा घेईल. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींकडून डीपीआर बनवून घेऊन तो म्हाडाकडे सादर करण्याबाबत पाठपुरावा करेल.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोडल एजंसी म्हणून डीएमएवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. ९ नोव्हेंबरला तसे निर्देश महापालिकेला प्राप्त झालेत.- हेमंतकुमार पवार,आयुक्त, अमरावती महापालिका