दिवाळीचा फराळ ‘आॅनलाईन’
By Admin | Updated: November 11, 2015 00:21 IST2015-11-11T00:21:08+5:302015-11-11T00:21:08+5:30
मांगल्याचे, तेजाचे प्रतीक म्हणजे दिवाळी. तिमिरातून तेजाकडे जाणारा हा सण. रांगोळ्याने अंगण सजते तर ..

दिवाळीचा फराळ ‘आॅनलाईन’
अमरावती : मांगल्याचे, तेजाचे प्रतीक म्हणजे दिवाळी. तिमिरातून तेजाकडे जाणारा हा सण. रांगोळ्याने अंगण सजते तर आकाशदिव्यांनी आसमंत उजळते. या पारंपरिक सणासाठी लागणाऱ्या गोष्टी मात्र काळानुरूप बदलत आहेत. दिवे असो की पणत्या, आकाशदिवे असोत की फराळ. त्यातला महत्त्वपूर्ण फराळ आता आॅनलाईन झाला आहे. फराळाचे विविध पदार्थ आॅनलाईन मागवले जात आहे.
महिला मोठ्या प्रमाणात नौकरी-व्यवसायासाठी बाहेर पडू लागल्याने फराळ घरी न बनविता रेडीमेड आणला जात आहे. त्यामुळे फराळ आॅनलाईनदेखील मिळू लागला आहे. ओएलएक्स व सोशल मीडियाच्या माध्यमातून फराळाची आॅनलाईन बुकिंग केली जात असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)