पोलिसांची दिवाळी 'आॅन ड्युटी' २४ तास

By Admin | Updated: November 14, 2015 00:25 IST2015-11-14T00:25:36+5:302015-11-14T00:25:36+5:30

दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटून भाऊबीज साजरी होत असताना समाजातील काही घटकांची दिवाळी आॅन ड्युटी होत आहे.

Diwali 'Aan Duty' of police 24 hours | पोलिसांची दिवाळी 'आॅन ड्युटी' २४ तास

पोलिसांची दिवाळी 'आॅन ड्युटी' २४ तास

भाऊबिजेलाही रस्त्यावर : शहरभर गस्त
अमरावती : दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटून भाऊबीज साजरी होत असताना समाजातील काही घटकांची दिवाळी आॅन ड्युटी होत आहे. आपली दिवाळी निर्विघ्न साजरी व्हावी, यासाठी ते सणांच्या काळात आपले कर्तव्य तत्परतेने बजावत आहेत.
दिवाळीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर चोऱ्या, घरफोड्या होऊ नयेत यासाठी रात्रकालीन गस्त घातली जात असून वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी रस्त्यावर आहेत. फटाक्यामुळे आगीची घटना घडल्यास ती तातडीने आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणासुद्धा सज्ज राहणार आहे.
कर्तव्य तत्परता
हीच त्यांची दिवाळी

पोलिसांसह अग्निशमन दलाचे जीवन, पाणीपुरवठा कर्मचारी सुरक्षारक्षक, एसटी चालक-वाहक, महापालिकेचे सफाई कामगार, घंटागाडी कामगार, पोस्टमन, छोटे व्यावसायिक यांचा या महत्त्वपूर्ण २४ बाय ७ सेवा देणाऱ्या घटकांमध्ये समावेश आहे.
बाजारपेठेत सशस्त्र बंदोबस्त
अमरावती : यातील कोणीही सुटी घेतली तर दिवाळीच्या आनंदावर विरजण पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे इतरांच्या आनंदात आपला आनंद मानून हे कर्मचारी कर्तव्यतत्पर राहत आहेत. समाजातील २० टक्के वर्ग हा केवळ इतरांच्या सुखात आनंद मानत असताना त्यांच्याविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करणेही गरजेचे असते.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची लगबग असताना पोलिसांसह कितीतरी घटक आपले कर्तव्य बजावत असतात. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत सशस्त्र पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावण्यात आले होते. यातून लुटमार, दागिने चोरी, चेन स्रॅचिंग दुचाकी चोरी आदी घटनांना पायबंद घालण्यात पोलीस यशस्वी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Diwali 'Aan Duty' of police 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.