महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकात दिव्याखाली अंधार
By Admin | Updated: June 7, 2015 00:25 IST2015-06-07T00:25:57+5:302015-06-07T00:25:57+5:30
महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे तत्कालीन विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनाम्याने या ....

महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकात दिव्याखाली अंधार
कारवाईपूर्वीच दिली जाते टिप्स : जयस्वाल नामक कर्मचाऱ्याचा प्रताप
अमरावती : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे तत्कालीन विभाग प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनाम्याने या विभागाला गालबोट लागले असताना याच पथकात त्यांचे लहान बंधू कार्यरत असल्याने हे पथक कारवाईला निघाले की हॉकर्स, अतिक्रमण धारकांना टिप्स दिली जात असल्याची तक्रार पोलीस निरिक्षकांनी दिली आहे. परिणाणी या पथकात दिव्याखाली अंधार, असा कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाचे निरीक्षक खराबे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. या पथकात कार्यरत कन्हैया जयस्वाल यांचे अतिक्रमण धारकांसोबत लागेबांधे असल्याचे पोलीस निरीक्षक खराबे यांनी थेट आरोप करीत तसे पत्र उपायुक्त विनायक औगड यांना दिले आहे. यापूर्वीचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या कारनामे संपत नाही तोच लहान बंधू कन्हैया जयस्वाल यांनी पैसे कमविण्यासाठी वेगळी बासरी वाजविण्याचा प्रकार सुरु केला आहे. हल्ली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे हे आहेत. त्यांच्या सोबतीला कन्हैया जयस्वाल आहेत. परंतु हे पथक कारवाईला निघाले की जयस्वाल हे साटेलोटे असलेल्या अतिक्रमण धारकांना मोबाईलने टिप्स देतात, अशी तक्रार पोलीस निरिक्षकांनीच केली आहे. त्यामुळे या पथकाच्या कारवाईवर शंका येवू लागल आहे. (प्रतिनिधी)
प्रकरण गंभीर; आयुक्तांकडे तक्रार
अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी कन्हैया जयस्वाल हे कारवाईला निघण्यापूर्वीच अतिक्रमणधारकांना सजग करतात. हा प्रकार सेवा आणि शिस्तीला छेद देणारा आहे. पोलीस निरीक्षक खराबे यांनी ही माहिती प्रशासनाला दिली असून आयुक्त गुडेवार रजेवरुन परतले की त्यांच्या समोर ही वास्तविकता मांडली जाईल, असे पोलीस पथकाचे म्हणणे आहे.