विशेष बदली प्रस्तावाला विभागीय आयुक्तांचा नकार
By Admin | Updated: September 2, 2014 23:24 IST2014-09-02T23:24:55+5:302014-09-02T23:24:55+5:30
जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर

विशेष बदली प्रस्तावाला विभागीय आयुक्तांचा नकार
अमरावती :जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत ३० आॅगस्ट रोजी दिले आहेत.
या सूचनेचे पालन करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुख यांच्या नावाने लेखी आदेश काढले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब, बदलीचे प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे शिफारशीने विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येतात. दरम्यान या मुद्दावर विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
त्यानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बाजु ऐकून यापुढे जिल्हा परिषदेतील विशेष बाब बदलीचे प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीत विभागीय आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवू नयेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुखांनी विशेष बाब बदलीचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे शिफारशीसाठी पुढील आदेशापर्यंत पाठवू नये, अशा स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी एका लेखी आदेशाव्दारे काढले आहेत. त्यामुळे विशेष बदलीसाठी धडपणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा पूर्ण हिरमोड होणार आहे. त्यामुळे आयुक्तांचा पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)