विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: June 20, 2017 00:04 IST2017-06-20T00:04:39+5:302017-06-20T00:04:39+5:30
नवे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी सोमवारी जे. पी. गुप्ता यांचेकडून पदभार स्वीकारला. सिंग हे सन २००० सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी पदभार स्वीकारला
अमरावती : नवे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी सोमवारी जे. पी. गुप्ता यांचेकडून पदभार स्वीकारला. सिंग हे सन २००० सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
यापूर्वी ते पुण्याला समाजकल्याण विभागाचे आयुक्त होते. अमरावती विभागाचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मकरित्या काम करण्याचे मनोदय त्यांनी व्यक्त केला. मावळते विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांची मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.