शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नाशिक जिल्ह्यात ३१ मे पर्यंत कलम-१४४ पून्हा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 21:42 IST

शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआजपासून धडक कारवाई संध्याकाळनंतर बाहेर पडण्यास बंदीकिरकोळ दुधविक्री सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त २० लोक

नाशिक : कोरोनाआजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरू आहे लॉकडाऊनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय हद्दीत व पोलीस अधिक्षक ग्रामिण यांच्या हद्दीत पुन्हा भादंवि कलम 144 सोमवारी दुपारी १ वाजेपासून पुन्हा लागू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केली.सोमवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्वच पोलिस ठाण्याकडून धडक कारवाई केली जाणार आहे. लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकावर बंधनकारक तर आहेच, मात्र ते आपले कर्तव्यदेखील आहे, हे विसरू नये, असे मांढरे म्हणाले. जमावबंदी, संचारबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.कोरोना आजाराला रोखण्यासाठी लॉकडाउन सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या यंत्रणेवर मात्र दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा ४६वर पोहचला आहे. त्यामुळं नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांनीही स्पष्ट केले आहे.भाजीपाला, दूध, किराणा विक्र ी-खरेदी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेतच करता येणार आहे. किरकोळ दुधविक्री सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यावेळी नागरिकांनी बाहेर पडताना ‘डिस्टन्स’ ठेवणे तोंडाला मास्क बांधणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, मद्यपानासह थुंकणे टाळावे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दहा वर्षांखालील बालकांनी घरांमध्येच राहण्यास अधिकाधिक प्राधान्य द्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuraj Mandhareसुरज मांढरेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील