जिल्हा सरपंच संघटना ‘परिवर्तन’ सोबत
By Admin | Updated: September 3, 2015 00:08 IST2015-09-03T00:08:56+5:302015-09-03T00:08:56+5:30
१५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

जिल्हा सरपंच संघटना ‘परिवर्तन’ सोबत
पत्रपरिषद : संजय बंड, बबलू देशमुख, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र गवई बाजार समितीसाठी एकत्र
अमरावती : १५ सप्टेंबरला होणाऱ्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष मोहन चव्हाण व उमेदवार शेख अहमद शेख ईस्माईल यांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला असल्याची माहिती संजय बंड यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
काही अटी व शर्तींसोबत आम्ही पाठिंबा देत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या धान्याचा एक दाणाही ओला होणार नाही. यासाठी पॅनेल सत्तेवर आल्यास दोन वर्षात स्वतंत्र व्यवस्था करु, बाजार समितीच्या माध्यमातून डबघाईस आलेल्या सोसायटींना स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न राहिला, बाजार समितीमधून सेसची गळती होते ती रोखल्यास सोसायटींचा विकास सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगीतल. ३१ आॅगष्टला चांगापूर येथील हनुमान मंदिरामध्ये सर्व प्रमुख सहकाऱ्यासमवेत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. असे बंड यांनी सांगीतले. बाजार समिती निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची माहिती यावेळी देण्यात आली.
गणेशराव कडू, प्रकाशराव काळबांडे, नाना नागमोते, अनिल पाथरे, प्रवीण भुगुल, संचिता संजय उमेकर, सुवर्णा गायकवाड, रविंद्र मालधूरे, सुनील वऱ्हाडे, रंगराव बिचुकले, भैयासाहेब निर्मळ हे या पॅनलचे उमेदवार आहेत. पत्रपरिषदेला रिपाईचे रामेश्वर अभ्यंकर, मनोज देशमुख, संतोष इंगोले आदि उपस्थित होते.