२८ लाख नागरिकांची जिल्ह्यात आधार नोंदणी
By Admin | Updated: September 26, 2015 00:07 IST2015-09-26T00:07:37+5:302015-09-26T00:07:37+5:30
शासनाने आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख़ २६ हजार ३१६ म्हणजेच ...

२८ लाख नागरिकांची जिल्ह्यात आधार नोंदणी
वितरणाचा टक्का मात्र कमी : नोंदणी अंतिम टप्प्यात
अमरावती : शासनाने आधारकार्ड नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत २८ लाख़ २६ हजार ३१६ म्हणजेच जवळपास ९७.८७ टक्के नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात ९६.३५ टक्के नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीच्या कामात काही ठिकाणी तांत्रिक अडचण आली असल्याने एका ठिकाणी महा ई-सेवा कंद्र बंद करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८७ हजार ८२६ इतकी आहे. त्यापैकी २८ लाख़ २६ हजार ३१६ नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.
काही महिन्यांत आधार नोंदणीच्या कामाला व्यापक स्वरुप देण्यात आल्याने आधार नोंदणीचा आकडा ९७.८७ पार केला आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महा-ई सेवा केंद्राला नोंदणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार जिल्ह्यातील महा-ई सेवा केंद्रावर नोंदणीची गती वाढविण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने गेल्या काही महिन्यांत आधार नोंदणीचे काम आता अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या २८ लाख २६ हजार ३१६ नागरिकांपैकी २६ लाख ४१ हजार ५४३ नागरिकांना आधार कार्ड वितरण करण्यात आले आहे. याची टक्केवारी ९१.४७ टक्के एवढी आहे. तरीही जिल्ह्यातील ६१ हजार ११० नागरिकांची आधार नोंदणी शिल्लक असल्याने या विभागानी दिलेल्या आकडेवारी वरून दिसून येते.त्यामुळे येत्या नोव्हेबर पर्यत जिल्ह्यातील शंभर टक्के नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. (प्रतिनिधी)