जिल्हा नियोजन समितीची सभा ३१ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:45+5:302021-02-05T05:25:45+5:30
अमरावती : संपूर्ण जिल्हा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार, ३१ जानेवारी रोजी नियोजन ...

जिल्हा नियोजन समितीची सभा ३१ जानेवारीला
अमरावती : संपूर्ण जिल्हा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार, ३१ जानेवारी रोजी नियोजन भवनात सकाळी ११ वाजता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. कोरोना लॉकडाऊन आणि त्यानंतर शिक्षक आणि नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तब्बल एक वर्षानंतर ही बैठक होणार आहे.
राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक अपेक्षित होती. परंतु, पालकमंत्री निश्चितीत वेळ गेला व त्यानंतर मार्च महिन्यात राज्यावर कोरोनाचे सावट उभे राहिले. लॉकडाऊनमुळे बैठकांवर निर्बंध आले. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, ही आचारसंहिता संपल्यानंतर लगेच संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे २५ जानेवारी २०२० नंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झालीच नाही. आता तब्बल एक वर्षानंतर होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत प्रामुख्याने सन २०१९ या वर्षाच्या खर्चाला मान्यता देणे, सन २०२०-२१च्या खर्चाचा आढावा, चालू वर्षाच्या खर्चाचे पुढील नियोजन करणे, सन २०२०-२१ च्या खर्चाच्या आराखड्यास मंजूरी दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचा व राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने नियोजन समितीला विशेष महत्त्व आहे.