दर्यापूर एसडीओंच्या फाईल तपासणीसाठी जिल्हाकचेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:58+5:302021-01-15T04:11:58+5:30

अमरावती : दर्यापूरच्या एसडीओ प्रियंका आंबेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमितता प्रकरणाची फाईल आता जिल्हाधिकारी कायार्लयात आणण्यात आली आहे. या ...

District office for inspection of files of Daryapur SDO | दर्यापूर एसडीओंच्या फाईल तपासणीसाठी जिल्हाकचेरीत

दर्यापूर एसडीओंच्या फाईल तपासणीसाठी जिल्हाकचेरीत

अमरावती : दर्यापूरच्या एसडीओ प्रियंका आंबेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमितता प्रकरणाची फाईल आता जिल्हाधिकारी कायार्लयात आणण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांची तपासणी जिल्हा पथकांद्वारा करण्यात येत असून, पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. यावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

प्रियंका आंबेकर यांनी आदेशीत एनए, सिलिंग, तुकडेबंदी व प्लॉट विभाजनाच्या बहुतांश प्रकरणांत अनियमिता असल्याचे लोकमतद्वारा जनदरबारात मांडताच जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय पथकांची नियुक्ती करून सर्व प्रकरणांची बारकाईने चौकशी व तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पथकाद्वारा एक आठवडा दर्यापूर कार्यालयात जाऊन संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली व आता उर्वरित फाईल अमरावती येथेच बोलावून तपासणी करण्यात येत आहे. पथकातील सर्व सदस्य अमरावतीचे असल्याने यात दर्यापूरला जाणे- येण्याच्या वेळेतही बचत होत असल्याने तपासणी गतीने होत असल्याचे सांगण्यात आले. साधारणपणे येत्या मंगळवार किंवा बुधवारी या सर्व प्रकरणातील अनियमिततेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बॉक्स

विभागीय आयुक्तांनाही देणार अहवाल

जिल्हा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग काय भुमिका घेते हे महत्वाचे आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीसह अहवाल विभागीय आयुक्तांना सादर होईल व जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात त्यावर विभागीय आयुक्तांद्वारे निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

बॉक्स

एडीटीपीची शिफारस नसताना ‘एनए’ प्रकार गंभीरच

दर्यापूर एसडीओंद्वारा सन २०१८ ते २० या कालावधीत मंजूर ४३ पैकी ४१ प्रकरणांत उपसंचालक नगर रचना विभागाची शिफारस नसणे हा गंभीर प्रकार आहे. याशिवाय काही सिलिंग प्रकरणात अनामत रकमेशिवाय फेरफार नोंदी, काही तुकडेबंदी प्रकरणांत लगतच्याशिवाय अन्य व्यक्तीला विक्रीला परवानगी आदी प्रकरणे गंभीर असल्याची चर्चा महसूल विभागात आहे.

कोट

जिल्हा समितीद्वारा सर्व प्रकरणांची चौकशी व तपासणी सुुरू आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.

- नितीन व्यवहारे,

निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: District office for inspection of files of Daryapur SDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.