- तर जिल्हाभर आंदोलन, शिवा संघटनेचा पालकमंत्र्यांना इशारा
By Admin | Updated: January 31, 2015 23:11 IST2015-01-31T23:11:05+5:302015-01-31T23:11:05+5:30
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची त्वरीत बदली करून चौकशीअंती कडक कारवाई करण्याची मागणी शिवा संघटनेने शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटून केली.

- तर जिल्हाभर आंदोलन, शिवा संघटनेचा पालकमंत्र्यांना इशारा
अमरावती : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांची त्वरीत बदली करून चौकशीअंती कडक कारवाई करण्याची मागणी शिवा संघटनेने शनिवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भेटून केली. तसे न केल्यास जिल्हाभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
'राणा लँडमार्क' प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या युवा सेनेच्या आंदोलनाला समर्थन देऊन मराठवाड्यातील शिवा संघटनेने ही मागणी केली. संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची यासंबंधाने भेट घेतली. यावेळी त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले.
गणेश अणे यांनी कर्तव्यदक्ष आणि स्वच्छ प्रतिमेच्या बुरख्याखाली राणा लँडमार्क प्रकरणात स्वत:चे उखळ पांढरे करवून घेतले. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध दाद मागणाऱ्या आंदोलकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर यांनीही युवा सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. (प्रतिनिधी)