ग्रामसडक योजनेची जिल्हास्तरीय समिती गठित

By Admin | Updated: February 6, 2016 00:15 IST2016-02-06T00:15:25+5:302016-02-06T00:15:25+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जिल्हास्तर समिती गुरुवारी गठित करण्यात आली. या योजनेचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री आहेत.

District level committee set up for Gram Sadak Yojna | ग्रामसडक योजनेची जिल्हास्तरीय समिती गठित

ग्रामसडक योजनेची जिल्हास्तरीय समिती गठित

पालकमंत्री अध्यक्ष : रस्ते निवडीचे अधिकार
अमरावती : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची जिल्हास्तर समिती गुरुवारी गठित करण्यात आली. या योजनेचे जिल्हाध्यक्ष पालकमंत्री आहेत. समितीला रस्त्याच्या कामाची निवड करण्याचे अधिकार आहेत. पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले दोन आमदार या समितीत आहेत व या योजनेचे अधीक्षक अभियंता या योजनेचे सचिव आहेत.
जिल्ह्यातील रस्त्याची तालुकानिहाय यादी सदस्य सचिव जिल्हा समितीला सादर करणार आहेत. आदिवासी क्षेत्रातील रस्त्याच्या निवडीसाठी स्वतंत्र सदस्य निवडीबाबत शासन स्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. या कामाची चालू आर्थिक वर्षाकरिता शासनाने नेमून उदिष्टपूर्तता विहित कालावधीत होण्याच्या दृष्टीने समितीचे कार्य राहील. सद्यस्थितीत या शासन नियुक्त समितीद्वारे या योजनेत विहित निकषानुसार रस्ते निवडीची कार्यवाही करण्याचे शासनाचे आदेश आहेत. समितीने निवड केलेल्या रस्त्यांच्या यादीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता यांनी रस्त्याच्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक शासनाच्या मान्यतेसाठी मुख्य अभियंता यांच्याकडे त्वरित सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव र.आ. नागरगोजे यांनी गुरुवारी यंत्रणेला दिले आहेत.

Web Title: District level committee set up for Gram Sadak Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.