जिल्हास्तरीय कला शिक्षकांची कार्यशाळा
By Admin | Updated: August 1, 2015 01:40 IST2015-08-01T01:40:03+5:302015-08-01T01:40:03+5:30
शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. व विदर्भ कला शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये

जिल्हास्तरीय कला शिक्षकांची कार्यशाळा
अमरावती : शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. व विदर्भ कला शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये कला विषयाचे अध्यापन करणाऱ्या कला शिक्षकांसाठी मनपा टाऊन हॉल, नेहरू मैदान येथे गुरुवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सी. आर. राठोड, उपशिक्षणाधिकारी अनिल कांबे, विदर्भ कला शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, विभागीय कार्यवाह गणेश भुतडा, मार्गदर्शक मोहन भोजापुरे, आरूफ खान, कैलास पेंढारकर, वनवे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम दीप प्रज्ज्वलनाने या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ कला शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले यांनी प्रास्ताविक केले. संचलन अभय गादे, संजय श्रीखंडे यांनी तर आभार प्रदर्शन एस.आर. पाटील, अनिल लांडे यांनी केले. (प्रतिनिधी)