जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपीला बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:21+5:302021-04-02T04:13:21+5:30
फोटो जे १ इर्विन मद्यपी अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी कुण्याही वाॅर्डासमोर थंड वातावरणात झोपलेले दिसतात. अशा एका ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपीला बदडले
फोटो जे १ इर्विन मद्यपी
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी कुण्याही वाॅर्डासमोर थंड वातावरणात झोपलेले दिसतात. अशा एका व्यक्तीला तेथील सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी बदडून बाहेर काढले.
जिल्हा शल्यचिकित्सक कक्षाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या एकांत स्थळी निद्राधीन झालेल्या मद्यपीला सुरक्षा रक्षकांनी उठवले आणि आवाराबाहेर जाण्यास फर्मावले. मात्र, तो अरेरावी करीत अंगावर धावल्याने बदडून काढण्यात आले. पाहून घेण्याची धमकी देत सदर मद्यपी निघून गेला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मद्यपी वारंवार आढळून येतात. त्यामुळे भुरट्या चोऱ्या वा लुबाडणुकीचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने व्यवस्था चोख करावी, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात येथील एका रुग्णांनी दिली.
---------------
रुग्णालयात सुरक्षा गार्ड तैनात आहेत. विनाकारण मद्यपी, व्यक्तीचा शिरकाव होत असल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना हाकलून लावणे अपेक्षित आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक