जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची रस्सीखेच
By Admin | Updated: November 11, 2014 22:31 IST2014-11-11T22:31:39+5:302014-11-11T22:31:39+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये २४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. एकूण दहा विषय समित्यांपैकी महत्वपूर्ण समिती असलेल्या जलव्यवस्थापन समितीसाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची रस्सीखेच
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये २४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. एकूण दहा विषय समित्यांपैकी महत्वपूर्ण समिती असलेल्या जलव्यवस्थापन समितीसाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
या समितीसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये काही प्रभावशाली जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा तसेच पंचायत समितीच्या सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नव्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत काही सदस्यांना पदावर संधी मिळाल्यामुळे दहा विषय समित्यांपैकी आठ समित्यांमध्ये सुमारे २४ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी आतापासूनच आपल्या राजकीय ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केले असल्याची माहिती आहे.
यामुळे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीसाठी इच्छुक असणाऱ्यांची यादी मोठी आहे. यामध्ये प्रभावी राजकीय वजन असलेल्या सदस्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. यासाठी काही सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.