जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक
By Admin | Updated: December 12, 2015 00:11 IST2015-12-12T00:11:29+5:302015-12-12T00:11:29+5:30
केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली.

जिल्हा काँग्रेसची विधानभवनावर धडक
अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करीत जिल्ह्यातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, शेतमजुरांनी विधानभवनावर धडक दिली.
दीक्षाभूमी ते विधानभवनादरम्यान निघालेल्या राज्यस्तरीय मोर्चात अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात लक्षणीय ठरली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्र्वासनाची पूर्ती तर सोडाच परंतु सर्वसामान्य व गरीब जनतेची कोणतीही अपेक्षा युती सरकाने पूर्ण केली नाही.
राज्यातील तमाम जनतेची व शेतकऱ्याच्या पाठीशी आजही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, पिकांची नुकसान भरपाई द्यावी, महागाई तातडीने कमी करावी, केशर रेशनधारकांना तातडीने स्वस्त धान्य द्यावे, आरक्षणावर भूमिका जाहीर करावी, संत्रा उत्पादकांना मदत द्यावी आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा विधानभवनावर निघाला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगतापल यशोमती ठाकूर, माजी आमदार केवलराम काळे, नरेंशचंद्र ठाकरे, रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, अरूणा गोरले, यशवंतराव शेरेकर, दिलीप महल्ले, पुष्पा बोंडे, छाया दंडाळे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)