ताफा थांबवून जिल्हाधिकाऱ्यांनी केली मल्हारावासीयांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:39+5:30
थेट घरकाम करीत असलेल्या महिलेजवळ जातो. तिच्या चेहºयाला काहीही बांधले नसल्याने जवळचा मास्क देतो. गावात रेशनचे धान्य वाटप झाले का, गावकरी काय करीत आहेत, शेतीची कामे आहेत का? आदी विचारपूस करतो. समाधानाने तो वाहनाचा ताफा पुढे निघून जातो. रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यानचे परतवाडा धारणी मार्गावरील मल्हारा गावातील हा प्रसंग. महिलेला स्वत:जवळचा मास्क देत रेशन कार्ड तपासणी करणारे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल होते.

ताफा थांबवून जिल्हाधिकाऱ्यांनी केली मल्हारावासीयांची चौकशी
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : देश लॉकडाऊन असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. अशात शासकीय वाहनांचा ताफा अचानक रस्त्यावरच थांबतो. त्यातून एक अधिकारी उतरतो. थेट घरकाम करीत असलेल्या महिलेजवळ जातो. तिच्या चेहºयाला काहीही बांधले नसल्याने जवळचा मास्क देतो. गावात रेशनचे धान्य वाटप झाले का, गावकरी काय करीत आहेत, शेतीची कामे आहेत का? आदी विचारपूस करतो. समाधानाने तो वाहनाचा ताफा पुढे निघून जातो. रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यानचे परतवाडा धारणी मार्गावरील मल्हारा गावातील हा प्रसंग.
महिलेला स्वत:जवळचा मास्क देत रेशन कार्ड तपासणी करणारे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल होते. रविवारी दुपारी ते परतवाडा येथे आले होते. यावेळी त्यांनी कुटीर रुग्णालय व समाज कल्याण वसतिगृहाची पाहणी केली. त्यानंतर हा ताफा बुरडघाट येथे गेला. या दोन्ही ठिकाणी रुग्णालय तयार केले जाणार असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. मल्हारा हे गाव अगदी रस्त्यावर असल्याने बुरघाट येथून परत येत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपला ताफा थांबवला. घरकाम करीत असलेल्या सुनीता ओंकार पोटे या महिलेजवळ ते गेले. त्यांच्या चेहऱ्याला मास्क नसल्याने त्यांनी जवळचे अतिरिक्त मास्क महिलेसह ईश्वर भक्ते यांना दिले.
एप्रिल महिन्यात मोफत धान्य
मार्च महिन्यात रेशन दुकानातून धान्य वाटप झाले असले तरी एप्रिल महिन्यात रेशन दुकानातून मोफत धान्य दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदर महिलेस दिली. कुठल्याच प्रकारचे पैसे न देण्याची त्यांनी या वेळी सांगितले. यावेळी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार मदन जाधव इतर अधिकारी उपस्थित होते.