बेरोजगार युवकांची न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
By Admin | Updated: October 9, 2015 00:49 IST2015-10-09T00:49:31+5:302015-10-09T00:49:31+5:30
येथील तपोवन मार्गावर ‘फिनो’ कंपनीच्या नावे बनावट कार्यालय सुरू करून अशासकीय योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याच्या नावाखाली ...

बेरोजगार युवकांची न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
‘फिनो’ प्रकरण : पोलिसात तक्रार
अमरावती : येथील तपोवन मार्गावर ‘फिनो’ कंपनीच्या नावे बनावट कार्यालय सुरू करून अशासकीय योजनांचे अनुदान बायोमेट्रिक पद्धतीने वाटप करण्याच्या नावाखाली बेरोजगार युवकांची समन्वयक म्हणून नियुक्तीत फसवणूक झाल्याप्रकरणी गुरुवारी काही युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांक डे धाव घेतली. निवेदन सादर करुन ‘आमचे पैसे परत मिळवून द्या’ अशी आर्त हाक त्यांच्या पुढ्यात मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात जिल्हा व तालुका स्तरावर ग्रामसमन्वयक पदाची नोकरी देण्याच्या नावाखाली ‘फिनो’ कंपनीचे जिल्हा समन्वयक जयसिंग सोळंके यांनी तपोवन मार्गावर ‘स्वाथम्’ या इमारतीत घेतलेल्या मुलाखतीदरम्यान समन्यवक पदासाठी रोख सहा हजार रुपये व अर्जाची रक्कम १०० रुपये घेतल्याची तक्रार दिली. नियुक्तीपत्र देऊन मोबाईल, मशीन दिली जाईल, असे आमीष देण्यात आल्याचे युवकांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र गुरुवारी ‘लोक मत’मध्ये ‘फिनो’ कंपनीने बनावट नियुक्ती करुन युवकांची फसवणूक झाल्याबाबत वृत्त प्रकाशित करताच तपोवन येथील कार्यालय गाठले. डॉ. सोळंके यांना विचारणा केली असता ‘मी तुम्हचे पैसे परत देत नाही, येथून ताबडतोब निघून जा नाहीरत पोलीस ठाण्यात तक्रार करेन’ अशी धमकी दिली.