अपंग जनता दलाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: August 20, 2014 23:15 IST2014-08-20T23:15:51+5:302014-08-20T23:15:51+5:30
दलित अपंग महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकराला फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी इर्विनचौक येथून अपंग जनता दलाच्या वतीने जिल्हा

अपंग जनता दलाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
अमरावती : दलित अपंग महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकराला फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी इर्विनचौक येथून अपंग जनता दलाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
जया पुंडलीक कांबळे या अपंग विवाहितेची ३ आॅगस्ट रोजी हत्या करण्यात आली. नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव माहोरे येथे तिचा पती नारायण भुजंग मोरे याने सासरकडून पैसे आणण्यासाठी जयाचा अमानुष छळ करून तिची निर्दयीपणे हत्या केली. या गंभीर प्रकरणात दोषी असलेला जयाचा मारेकरी नारायण मोरे याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अपंग जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाय योजना केली जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाला दिले.
आंदोलनात अपंग जनता दलाचे पदाधिकारी शेख अनिस, संजय पंडित, ज्योती देवकर, प्रकाश साठेकर, अब्दुल सईद यांच्यासह जयाचे कुंटुंबीय व असंख्य अपंग बांधव सहभागी होते.