जिल्ह्यात साथरोग
By Admin | Updated: October 27, 2014 22:28 IST2014-10-27T22:28:17+5:302014-10-27T22:28:17+5:30
दर्यापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. परिसरातील अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे.

जिल्ह्यात साथरोग
लेहेगाव (रेल्वे) : दर्यापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. परिसरातील अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे.
लेहेगाव परिसरात गेल्या महिन्यापासून तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लेहेगावात दहाच्या जवळपास डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. अलीकडेच परिसरातील २२ वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. रत्ना मधुकर पाचुरकर (४७) या महिलेचासुध्दा डेंग्यूने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. परिसरातील नाचोना, खुर्माबाद, इटकी, वडाळगव्हाण, माहुली, कान्होली या गावांमध्येसुध्दा तापाची साथ असल्याचे दिसते. परिसरातील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी नियमित फवारणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.