कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्यांना वृक्षवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:38+5:302021-07-19T04:09:38+5:30

परतवाडा : नजीकच्या कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवजात कन्यारत्नांच्या नावे साग, आंबा, फणस, चिंच व जांभूळ या प्रजातीची ...

Distribution of trees to girls born in a farming family in Kandli | कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्यांना वृक्षवाटप

कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कन्यांना वृक्षवाटप

परतवाडा : नजीकच्या कांडली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नवजात कन्यारत्नांच्या नावे साग, आंबा, फणस, चिंच व जांभूळ या प्रजातीची प्रत्येकी १० रोपे अशी ५० रोपांचे अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या शेततलावावर मोफत वाटप करण्यात आले. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट वन्यजीव जयोती बॅनर्जी यांच्या हस्ते व उपवनसंरक्षक (प्रादेशिक ) गिन्नी सिंग, उपवनसंरक्षक (वन्यजीव) अविनाशकुमार, विभागीय वन अधिकारी पीयूषा जगताप, मधुमीता, जमीला शेख, नितीन गोंडाने, सहाययक वनसंरक्षक गणेश पटोळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने अचलपूर स्थित कृषी संशाधन केंद्राच्या ११ हेक्टर क्षेत्रावरील १२ हजार २२१ रोपे व ५० लक्ष लिटर जलधारण करणाऱ्या सात तलावांची पाहणी जयोती बॅनर्जी यांनी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक माकडे व कर्मचारी अ. मजीद शेख लतीफ, एम.एफ. रचे, एन.ए. हिरे, एस.एच, बुंदेले, जी.पी. वसु यांच्या कार्याबाबत बॅनर्जी यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Distribution of trees to girls born in a farming family in Kandli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.