राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:29+5:302021-05-19T04:13:29+5:30
अमरावती : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना २१ मे रोजी ...

राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण
अमरावती : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार १५ जणांना २१ मे रोजी शेताच्या बांधावर प्रदान करण्यात येईल. दिवंगत खासदार तथा काँग्रेस नेते राजीव सातव यांना यंदाचा सोहळा समर्पित करण्यात आल्याची माहिती राजीव गांधी कृषिविज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानकडून कृषिक्षेत्राला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकरी समाजाला आत्मनिर्भर करणारे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी शेतकरी सन्मान दरवर्षी आयोजित केला जातो. निवड समितीच्या अध्यक्ष पौर्णिमा सवाई यांच्या अध्यक्षतेखाली १५ कृषिरत्नांच्या निवडीवर यंदा शिक्कामोर्तब करण्यात आले. पौर्णिमा सवाई, किशोर चांगले, मिलिंद फाळके, भैयासाहेब निचळ, प्रकाश साबळे यांच्या उपस्थितीत २१ मे रोजी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन गौरव केला जाणार आहे. .
बॉक्स
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
दादाराव घायर (संत्राउत्पादक शेतकरी), ममता प्रमोदसिंह ठाकूर (महिला शेतकरी), नामदेव आनंद वैद्य (कृषिउद्योजक), निखील रमेश यादव (कृषी विद्यार्थी), महेंद्र भीमराव ढवळे (रेशीम उद्योग अधिकारी), मनोज सुरेश काळे (कृषी मार्गदर्शक), सुमीत मातीकाळे (कृषी मित्र), ज्ञानेश्वर डेहनकर (उत्कृष्ट तिफनकरी), अमिताभ तरार (संत्राउत्पादक शेतकरी), संजय जानराव गांजरे (कापूस उत्पादक शेतकरी), सतीश ज्ञानेश्वर औसीकर (दूध उत्पादक शेतकरी), अनिल मधुकर बंड (हवामानशास्त्रज्ञ), मोहन अटाळकर (उत्कृष्ट कृषी पत्रकारिता), नीलेश दत्तात्रय पेठे (हरभरा उत्पादक शेतकरी), सुधीर फडके (उत्कृष्ट बैलजोडी मालक)