छत्रपती पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:53 IST2018-07-18T23:53:03+5:302018-07-18T23:53:22+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती क्रीडा पुरस्कार राजा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदानित शाळांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.

छत्रपती पुरस्काराचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती क्रीडा पुरस्कार राजा सत्कार व प्रोत्साहनपर अनुदानित शाळांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थीचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमोद चांदुरकर (संघटक), संगीता येवतीकर, स्वप्निल धोपडे, तुषार शेळके, नीता रंगे, पूर्वशा शेंडे, वृषाली गोर्ले यांना सन्मानित करण्यात आले. सन २०१७-१८ च्या जिल्हास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धेत स्कूल आॅफ स्कॉलर्स, ज्ञानमाता हायस्कूल, इंडो पब्लिक स्कूल, गोल्डन इंग्लिश स्कूल, ब्रिजलाल बियाणी कनिष्ठ महाविद्यालय, विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, डॉ.एम.के. पवार पब्लिक स्कूल धामणगाव रेल्वे आदींना धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रिडाधिकारी गणेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डी.एस. महानकर यांनी केले.