घरपोच सकस आहार वितरणावरू न असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:52+5:30
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल क्षेत्रांमधील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांत ‘ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्तनदा आणि गरोदर मातांना सकस चौरस आहार मिळावा म्हणून अंगणवाडी केंद्रातून एक वेळचा आहार शिजवून देण्याचे आदेशित आहे . या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३५ रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते.

घरपोच सकस आहार वितरणावरू न असंतोष
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : येथे सोमवारी आलेल्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी सदर योजनेचा थेट लाभ लाभार्थींना अन्न शिजवून प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी डबे पोहोचून देण्याचे आदेशित केले. अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आणि त्यांच्या मदतनीस यांच्यात या निर्णयामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही आदिवासीबहुल क्षेत्रांमधील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांत ‘ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्तनदा आणि गरोदर मातांना सकस चौरस आहार मिळावा म्हणून अंगणवाडी केंद्रातून एक वेळचा आहार शिजवून देण्याचे आदेशित आहे . या योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३५ रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते.
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी स्तनदा व गरोदर मातांना कच्चा धान्यपुरवठा करण्यात आला होता. त्याप्रमाणे लाभार्थींना गेल्या महिन्यात वाटपसुद्धा केले गेले आहे.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सर्वत्र नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. या दुर्धर आजारपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. अशा वातावरणात अंगणवाडीमार्फत मदतनिसांद्वारे स्तनदा व गरोदर माता यांना घरपोच डबे पोहचवण्याचे भले मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अंगणवाडी केंद्रात जवळपास प्रत्येक केंद्रात २० ते ३० लाभार्थी आहेत. अशा प्रत्येक लाभार्थींना डबा पोहचवून देणे आणि तो डबा रिकामा करून आणून दुसऱ्या घरी पुन्हा डबा पोहचवणे असे जिकरीचे काम मदतनिसांकडून केले जाणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही योजना कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनासुद्धा कुटुंब आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती मदतनिसांना भेडसावत आहे. प्रत्येक घरात जाऊन डबा देणे आणि तो डबा रिकामे होईपर्यंत तिथे प्रतीक्षा करणे आणि नंतर रिकामा झालेला डबा परत घेऊन अंगणवाडी केंद्रात येऊन दुसरा डबा भरून दुसºया लाभार्थीपर्यंत जाणे; यात एखाद्या घरात कोरोना विषाणूचा लागण असल्यास मदतनीस सुरक्षित राहील का, अशी चर्चा सध्या अंगणवाडी सेविकांमध्ये होत आहे.
मागील आठवड्यापर्यंत आहार वितरण बंदच होते. मात्र, गरोदर आणि स्तनदा मातांना आहाराची निकड असल्याने वरिष्ठ स्तरावरू न तो आहार घरपोच देण्याचे निर्देश आलेत. वितरणावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे.
- प्रशांत थोरात,
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.अमरावती