गावाकडच्या भानगडी पंचायत समितीमध्ये होणार निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:05+5:302021-07-10T04:10:05+5:30
अचलपुरात अकरापैकी नऊ तक्रारी निकाली जिल्ह्यातील पहिला उपक्रम अचलपूर पंचायत समितीमध्ये (फोटो कॅप्शन तक्रारीचा निपटारा करताना सहायक ...

गावाकडच्या भानगडी पंचायत समितीमध्ये होणार निपटारा
अचलपुरात अकरापैकी नऊ तक्रारी निकाली
जिल्ह्यातील पहिला उपक्रम अचलपूर पंचायत समितीमध्ये
(फोटो कॅप्शन तक्रारीचा निपटारा करताना सहायक बीडीओ महादेव कासदेकर तक्रार करते व इतर कर्मचारी.)
लोकमत विशेष
परतवाडा लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे
गावातील ग्रामपंचायत तुमच्या तक्रारीसंदर्भात दखल घेत नाही. पंचायत समिती जिल्हा परिषदपर्यंत त्या तक्रारींचा पाठपुरावा केला जातो. त्यात बरेच दिवस आणि वेळ निघून जातो. हा सर्व खटाटोप आता बंद झाला आहे. ग्रामपंचायतीच्या तक्रारी निवारण अचलपूर पंचायत समितीने जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबवित महिन्याचा पहिला सोमवार तक्रार निवारण दिन म्हणून सुरू केला आहे. पहिल्याच सोमवारी ११ तक्रारींपैकी ९ चे निवारण करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे ग्रामपंचायत स्थरावरील अनेक तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे प्राप्त होतात. या तक्रारींचा निपटारा योग्य वेळेच्या आत होणे व जिल्हा पातळीवर जास्त निवेदन तथा तक्रारी येणार नाहीत, याबाबत जिल्हा परिषद सीईओ अविशयांत पंडा यांनी जिल्ह्यातील पंचायत समित्यांना निवेदन दिले होते.
अचलपूर पंचायत समिती येथे दर महिन्याचा पहिल्या सोमवारला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे व सहायक गटविकास अधिकारी श्री महादेव कासदेकर यांनी तक्रार निवारण समिती स्थापन करून प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवारला पंचायत समिती, अचलपूर कार्यालयात तक्रार निवारण दिन घेण्याचे ठरविण्यात आले.
त्या अनुषंगाने पंचायत समिती, अचलपूर कार्यालयात जुलै महिन्याचा पहिला सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ सोमवार रोजी नागरिकांचे निवेदन व तक्रारींचे निराकरण दिवस राबविण्यात आले.
या दिवशी एकूण ११ पैकी ९ ग्रामपंचायतींच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
तक्रार निवारण दिन यशस्वी होण्याकरिता
गटविकास अधिकारी जयंत बाबरे
सहायक गटविकास अधिकारी, महादेव कासदेकर, विस्तार अधिकारी अनिल फुटाणे, विस्तार कनिष्ठ लिपिक शिल्पा राऊत, घरकुल योजनेचे लिपिक मग्रारोहयो बारखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
तक्रारदार सचिव सर्व उपस्थित
निवेदन तक्रारीच्या अनुषंगाने या अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सचिव व ज्यांच्या विरुद्ध नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्या सर्वांना पंचायत समितीमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण दिनामध्ये उपस्थित करून त्याचा निपटारा करण्याचा हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील इतर पंचायत समितीने अचलपूर पंचायत समितीचा हा उपक्रम राबविल्यास त्यांना तत्काळ न्याय मिळणार आहे.
कोट
गावस्तरीय ग्रामपंचायतीसंदर्भातच्या तक्रारी जिल्हा परिषदपर्यंत जाऊन मोठ्या प्रमाणात खत निर्माण होते. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी एका बैठकीत यासंदर्भात खंत व्यक्त केली होती. त्यावर पर्याय म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केला.
जयंत बाबरे
गटविकास अधिकारी
पंचायत समिती अचलपूर
कोट
महिन्याच्या पहिल्या सोमवारी गावस्तरावर ग्रामपंचायती किंवा इतर पंचायत समिती संबंधित तक्रारी निवारण करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला असून, पहिल्याच सोमवारी ११ पैकी ९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
महादेव कासदेकर
सहायक बीडीओ
पं. स. अचलपूर.
090721\img-20210708-wa0162.jpg
तक्रार निवारण दिन तक्रार करते पंचायत समिती अचलपूर