मृत वन्यप्राण्यांची परस्परच विल्हेवाट!
By Admin | Updated: September 1, 2015 00:12 IST2015-09-01T00:12:07+5:302015-09-01T00:12:07+5:30
अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मृत वन्यप्राण्यांची परस्परच विल्हेवाट!
वनविभागाचा हलगर्जीपणा : वाघ, बिबटखेरीज अन्य प्राणी उपेक्षित
अमरावती : अपघातात मृत पावलेले अथवा मृतावस्थेत आढळून आलेल्या काही वन्यप्राण्याची संबंधित नागरिकच परस्पर विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनविभाग केवळ वाघ व बिबट या वन्यप्राण्यांवर लक्ष केंद्रित करीत असल्यामुळे अन्य प्राण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हा एकाप्रकारे वनविभागाचा हलगर्जीपणाच असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमीमध्ये आहे.
वनपरिक्षेत्राला अनेक गावाचा वेढा असल्यामुळे जंगलातील मार्गावर वाहनाची सतत वर्दळ सुरु असते. अशावेळी जंगलातील वन्यप्राणी मार्गावर येऊन ते वाहनाच्या धडकेत मृत पावतात. याबाबत एखादा सुजाण नागरिक वन्यप्राणी मृत पावल्याची माहीती वनविभागाला देते. मात्र, वाघ व बिबटसंबधित माहिती असल्यास वनकर्मचारी घटनास्थळी जाऊन वनगुन्हाची नोंद करतात. मात्र, सर्वसाधारण वन्यप्राणी मृत पावल्यास त्यांची नोंद वनाधिकारी करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच शहरानजीकच्या भागातही काही सर्वसाधारण वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्यास दखल घेतली जात नाही. मृत वन्यप्राण्याची माहिती देणाऱ्या नागरिकांनाच विल्हेवाट लावण्यासाठी वनविभागाकडून सांगण्यात येते. या प्रकारामुळे शिकारीसुध्दा डाव साधून वन्यप्राण्याची शिकार करू शकतो, याची पुसटशी कल्पना वनविभागााला नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी )
अपघातात वाघ व बिबट मृत पावल्यास वनगुन्हाची नोंद केली जाते, मात्र, वन्यप्राण्यातीलच अन्य साधारण प्राण्याबाबत वनगुन्हा नोंद केला जात नाही. संबंधित व्यक्तीलाच मृत प्राण्याला जमिनीत पुरविण्याच्या सूचना देण्यात येते.
-पी.के. लाकडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी वनपरिक्षेत्र.