शालेय रेकॉर्ड दिले नसल्याबाबतचा खटला खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:41+5:302021-09-24T04:14:41+5:30
अमरावती : सातेगाव एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित जे.डी. पाटील हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वसंतराव मानकर यांनी शालेय रेकॉर्ड दिले नसल्याबाबतचा दाखल ...

शालेय रेकॉर्ड दिले नसल्याबाबतचा खटला खारीज
अमरावती : सातेगाव एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित जे.डी. पाटील हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वसंतराव मानकर यांनी शालेय रेकॉर्ड दिले नसल्याबाबतचा दाखल खटला न्यायालयाने खारीज केला. यासंदर्भात वसंतराव मानकर यांच्या मृत्यूपश्चात पत्नी रेखा यांनी १३ वर्षे न्यायालयीन लढा दिला, हे विशेष!
सातेगाव येथील जे.डी. पाटील हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वसंतराव मानकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर शालेय रेकार्ड दिले नसल्याबाबत तत्कालीन संस्था अध्यक्ष नारायण मानकर व मुख्याध्यापिका उषा खडसे ( मानकर) यांनी अंजनगावातील दिवाणी न्यायालयात खटला क्र ५८/ २००८ दाखल केला होता. यादरम्यान वसंतराव मानकर यांचे निधन झाल्यामुळे पत्नी रेखा मानकर यांनी याप्रकरणी पतीवरील वरिल संस्थेचे आरोप खोटे ठरविण्यासाठी तब्बल १३ वर्षे न्यायालयीन लढा दिला. ३ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयाने त्यांचे बाजूने निर्णय देऊन संस्थेचा दावा खारीज केला. यावेळी मानकर यांच्यावतीने ॲड. चक्रधर हाडोळे यांनी काम पाहिले.