ढोल-ताशांच्या निनादात ‘ती’च्या गणपतीला निरोप..

By Admin | Updated: September 16, 2016 00:50 IST2016-09-16T00:50:36+5:302016-09-16T00:50:36+5:30

लोकमत कार्यालयातील ‘ती’च्या गणपतीला गुरूवारी ढोल-ताशांच्या निनादात थाटात निरोप देण्यात आला

Dismissed the drum and the cards. | ढोल-ताशांच्या निनादात ‘ती’च्या गणपतीला निरोप..

ढोल-ताशांच्या निनादात ‘ती’च्या गणपतीला निरोप..

ढोल-ताशांच्या निनादात ‘ती’च्या गणपतीला निरोप.. : लोकमत कार्यालयातील ‘ती’च्या गणपतीला गुरूवारी ढोल-ताशांच्या निनादात थाटात निरोप देण्यात आला. विघ्नहर्त्याची निरोपाची आरती अंबानगरीच्या प्रथम नागरिक महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला थाटात प्रारंभ झाला. यावेळी तुषार वरणगांवकर यांच्या नेतृत्वातील छत्रपती ढोल-ताशा पथकाच्या रंगतदार वादनाने आसमंत निनादला होता. लोकमतच्या कर्मचाऱ्यांंसह सखीमंचच्या सदस्यांनी धम्माल नृत्य केले. छत्रपती ढोल-ताशा पथकाच्या लयबद्ध वादनाचा आस्वाद घेण्याकरिता बघ्यांची गर्दी उसळली होती. वाहनधारकांनी तसेच पादचाऱ्यांनी थांबून मिरवणुकीचा जल्लोष मोबाईलमध्ये टिपला. त्यानंतर ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.

Web Title: Dismissed the drum and the cards.